Nashik News : कुंदेवाडी ग्रामविकास अधिकाऱ्यास मारहाण; संशयितास अटक करण्याची ग्रामसेवक संघटनेची मागणी

Nashik News : ग्रामविकास अधिकारी शशिकांत बाबूराव पवार यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी गावातीलच राजेंद्र सोनवणे विरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Officials of Gramsevak Union giving a statement to Police Inspector Sambhaji Gaikwad.
Officials of Gramsevak Union giving a statement to Police Inspector Sambhaji Gaikwad.esakal

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील ग्रामविकास अधिकारी शशिकांत बाबूराव पवार यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी गावातीलच राजेंद्र सोनवणे विरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित सोनवणे यास अटक करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची मागणी सिन्नर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली. (Beating Kundewadi Village Development Officer Gram Sevak Sangathan demands to arrest suspect)

मे २०२३ मध्ये कुंदेवाडी येथे राहणारे राजेंद्र सोनवणे यांची कुंदेवाडी ते मुसळगाव रोडलगत असलेली अतिक्रमित टपरी काढण्यात आली होती. ही कारवाई करत असताना अतिक्रमित टपरीमध्ये असलेले टेबल फ्रिज मांडणी व इतर साहित्य पंचनामा करून ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आले होते.

सदर अतिक्रमण हटवण्यासाठी केलेल्या कारवाईचा खर्च म्हणून ३१ हजार रुपये ग्रामपंचायत मार्फत सोनवणे यांच्या नावावर टाकण्यात आले होते. मंगळवारी (ता.२१) दुपारी तीनला ग्रामविकास अधिकारी श्री. पवार व संगणक परिचालक मनीषा बैरागी कार्यालयात काम करत असताना संदीप नाठे याने कार्यालयात येत राजेंद्र सोनवणे यांचा ग्रामपंचायत मध्ये ठेवलेला फ्रिज घ्यायचा असल्याचे सांगून सोनवणे यांना फोन करून ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेतले.

श्री. पवार यांनी पहिले ३१ हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य मंडळाने ठराव करून वसूल करण्यास सांगितले आहेत. ते भरल्यानंतर फ्रिज देण्यात येईल असे सांगितले. मी आता दहा हजार रुपये भरू शकतो असे सोनवणे यांनी सांगितले. (latest marathi news)

Officials of Gramsevak Union giving a statement to Police Inspector Sambhaji Gaikwad.
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

यास ग्रामसेवक श्री. पवार यांनी नकार दिल्याचा सोनवणे यास राग आल्याने त्याने श्री. पवार यांची नेमप्लेट त्यांच्या डोक्यात मारत शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन दिले.

याप्रसंगी ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक अनिल कानवडे, ग्रामसेवक युनियनचे संजय गिरी, सचिव जालिंदर वाडगे, कोषाध्यक्ष मच्छिंद्र बनगर, सहसचिव प्रवीण बोरसे, संघटक विलास सांगळे, रामेश्वर झगडे, शशिकांत पवार यावेळी उपस्थित होते.

Officials of Gramsevak Union giving a statement to Police Inspector Sambhaji Gaikwad.
Nashik MSEDCL Tree Cutting : झाडांची छाटणी की कत्तल? वीजवितरण कंपनीवर कारवाईची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com