NMC Recruitment : आचारसंहितेपूर्वी शासनाला आकृतिबंध सादर; डिसेंबर अखेर महापालिकेत मोठ्या भरतीचे संकेत

NMC Recruitment : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नुकताच मंजूर केलेला सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला आहे.
nmc
nmcesakal

NMC Recruitment : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नुकताच मंजूर केलेला सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांना शासनाने मंजुरी दिल्यास डिसेंबरअखेर महापालिकेत मोठी भरती होण्याचे संकेत आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली आणावा लागणार आहे. (nashik big recruitment in Municipal Corporation marathi news)

‘क’ वर्गात समावेश असलेल्या महापालिकेचा पहिला ७०९२ पदांचा आकृतिबंध १९९६ मध्ये मंजूर करण्यात आला. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या मात्र ३,३१४ वर गेली. महापालिकेची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली. मात्र कर्मचारी संख्या रोडावल्याने नागरीकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. कोरोनानंतर शासनाने आरोग्य, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित ६२५ नवीन पदांना मंजुरी दिली.

त्यामुळे आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदांची संख्या ७७१७ वर पोचली. त्यापूर्वी २०१७ मध्ये १४,४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला. परंतु शासनाने आकृतिबंध अव्यवहार्य ठरविला. त्यानंतर सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी दिली. या सर्व विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे ९०१६ पदांचा एकत्रित प्रस्ताव प्रशासनाने तयार केला.

मागील आठवड्यात महासभेत मंजुरी देण्यात आली. पहिल्या आकृतिबंधात सफाई कर्मचाऱ्यांच्या १९९३ पदांना मंजुरी देण्यात आली होती. सुधारित आकृतिबंधात पदांची संख्या जैसे-थे ठेवण्यात आली. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने त्यापूर्वी प्रशासनाने मंजुरीसाठी आकृतिबंध सादर केला. शासन मान्यतेनंतर पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल.(latest marathi news)

nmc
NMC Recruitment : राज्य शासनाने आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला

वर्ग सध्याची मंजूर पदसंख्या नवी पदनिर्मिती निरस्त पदसंख्या एकूण नवीन पदसंख्या

अ २३३ २११ ० ४४४

ब १५३ ८३ २ २३४

क २४८९ १२६५ ९९ ३६५५

ड २८५७ ३९४ ५६१ २६९०

सफाई कर्मचारी १९९३ ० ० १९५३

एकूण ७७२५ १९५३ ६६२ ९०१६

nmc
NMC Recruitment: महापालिका नोकरभरती अंतिम टप्प्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com