NMC Recruitment : राज्य शासनाने आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

NMC Recruitment : अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदांच्या भरतीचा जुलै महिन्यात नारळ फुटत असतानाच राज्य शासनाने सुधारित आकृतिबंधानुसार महापालिकेकडे रिक्त असलेल्या आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला आहे.

त्याअनुषंगाने प्रशासन विभागाने महापालिकेच्या ४३ विभागांकडून रिक्त पदे व त्या पदांची आवश्यकता या संदर्भात सविस्तर माहिती मागविली आहे. (NMC Recruitment state government called for job chart of required posts nashik news)

नाशिक महापालिकेमध्ये ७०९० पर्यंतचा पहिला आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळाल्याने नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने जवळपास दुप्पट म्हणजे १४७१५ पदांचा आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. पूर्वीच्या ७०९० पदांपैकी जवळपास २८०० पदे सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे रिक्त झाली आहे.

त्यामुळे महापालिकेत रिक्त पदांची संख्या वाढली आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन टेबल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. दरम्यान, कोविड पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय विभागातील जवळपास ७०६ पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC Water Tap Connection: नळजोडण्या अधिकृतसाठी अवघे 157 अर्ज; थेट कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माध्यमातून सदरची पदे भरली जातील. जुलै महिन्यात रिक्त पदे भरली जाणार आहे. दरम्यान, एकीकडे ही भरती प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारने आस्थापना खर्चावरील बंदी उठवली आहे.

त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात २००० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महापालिकेकडून जॉब चार्ट मागितला असून, प्रशासनानेदेखील ४३ विभागांकडून आवश्यक रिक्त पदांची यादी मागितली आहे.

"आस्थापना खर्चावरील नियम शिथिल करण्यात आल्याने राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सुधारित आकृतिबंधातील रिक्त पदांचा जॉब चार्ट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत." - मनोज घोडे- पाटील, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

NMC Nashik News
Sharad Ponkshe : स्वा. सावरकरांनाही काँग्रेसची ऑफर होती पण...; अभिनेते शरद पोंक्षे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com