Nashik: नाशिक- बेळगाव विमानसेवा जानेवारी पासून अपेक्षित; ज्योतिरादित्य शिंदे यांची भुजबळांना माहिती

Jotiraditya Scindia Letter to Chhagan Bhujbal
Jotiraditya Scindia Letter to Chhagan Bhujbalesakal

नाशिक : नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्या पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली.

श्री. भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. (Nashik-Belgaum flight expected from January Information about Jyotiraditya Shinde to Bhujbal nashik Latest Marathi News)

केंद्र सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला ९ शहरांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु ३ वर्षांनंतरही विमान कंपन्यांनी आरसीएस उडान १ , उडान २, उडान ३ मधील बिडिंग दरम्यान प्रदान केलेल्या सेक्टर्समध्ये सेवा सुरू केल्या नाहीत म्हणून विविध कारणांमुळे उडान योजनेच्या उद्देशाला बगल दिली असल्याचे म्हटले.

अहमदाबाद व पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूएट व बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या. परंतु ट्रूजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिकमधून ऑपरेशन्स स्थगित करत आहेत. यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला आणखी धक्का बसणार आहे. त्यामुळे या विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली होती.

Jotiraditya Scindia Letter to Chhagan Bhujbal
Nashik Political : बाळासाहेबांच्या शिवसेनेत नाराजीचे फटाके फुटणार

नाशिक विमानतळ अहमदाबाद, बंगलोरशी जोडणारे आरसीएस मार्ग बेळगाव, भोपाळ, गोवा, हिंडन, हैदराबाद आणि पुणे या निवडकांना पुरस्कार देण्यात आला. आरसीएस-उडान अंतर्गत एअरलाइन ऑपरेटर मेसर्स घोडावत यांनी आरसीएस उड्डाणे सुरू केली. मात्र नाशिक नाशिक ते बेळगाव प्रवासी वाहतूक सेवा मागणी आणि कमी प्रवाशांमुळे बंद करण्यात आलेली आहे. ही सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून जानेवारी २०२३ पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होणे अपेक्षित असल्याची माहिती श्री शिंदिया यांनी पत्राद्वारे दिली आहे.

तसेच आरसीएस मार्ग स्पाइसजेटद्वारे नाशिक ते हैदराबादला सेवा सुरू आहे. व्हीजीएफ शिवाय ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करणार्याह सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. मे.अलायन्स एअर ने ०१ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि २७ ऑक्टोबर २०१९ रोजी नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ते ऑपरेट करू शकले नाहीत. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Jotiraditya Scindia Letter to Chhagan Bhujbal
Local Bodies Elections : घालमेल वाढली, खर्चावरही बंधने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com