Nashik News : बुकींची जोरदार ‘बेटिंग’, ‘आयपीएल’च्या सुरवातीलाच लाखोंचा सट्टा

Nashik : आयपीएल’चे सामने शुक्रवार (ता. २२) पासून सुरू झाले आहेत. या सामन्यांवर बुकींनी लाखोंची सट्टेबाजी केली.
ipl betting
ipl bettingesakal

Nashik News : ‘आयपीएल’चे सामने शुक्रवार (ता. २२) पासून सुरू झाले आहेत. या सामन्यांवर बुकींनी लाखोंची सट्टेबाजी केली. सलामीच्या सामन्यापासूनच सट्टेबाज जोरदार फटकेबाजी करीत असताना, पोलिसांची मिस फिल्डिंग ठळकपणे दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात सट्टेबाजांनी आतापर्यंतच्या सामन्यांवर लाखोंची सट्टेबाजी करत बक्कळ कमिशन मिळविल्याची माहिती आहे. (Nashik betting of bookies bets of lakhs at beginning of IPL marathi News)

सट्टा घेणाऱ्या बड्या बुकींची संख्या मोठी आहे. सट्टेबाजीचे नेटवर्क चालविण्यात मोठ्या बुकींपेक्षा छोटे बुकी अधिक सक्रिय असतात. ग्राहकांच्या थेट संपर्कात छोटे बुकीच असतात. आयपीएलच्या पहिल्या सामन्यावरच बुकींनी लाखोंची लयलूट केली. मोठ्या बुकींनी सट्टा नेटवर्क चालविण्यासाठी शहरातील ठिकाणे ठरविली आहेत.

बुकींकडून सट्टा लावणाऱ्याला ॲपचा एक आयडी देण्यात येतो. त्याआधारे हा सट्टा लावला जातो. मात्र, व्यवहार रोख स्वरूपात केले जातात. ‘आयपीएल’वर चालणारा सट्टा आणि बुकींचे नेटवर्क खूप मोठे आहे. नाशिक जिल्ह्यात नामांकित सात ते आठ मोठे बुकी आहेत. यातील काहींना राजकीय आश्रय आहे. (latest marathi news)

ipl betting
Nashik News : चांदवड बसस्थानकात प्रवाशांना मिळणार थंड पाणी

स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाण्यातील ‘डीबी’च्या कर्मचाऱ्यांना सट्टेबाजांची खडान्‌खडा माहिती असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बड्या सट्टेबाजांची ठिकाणेही पोलिसांना माहिती आहेत. मात्र, दरवर्षी कारवाईचा देखावा होतो. मग या बुकींची नेमकी मिलीभगत कोणाशी? त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे प्रश्न उपस्थित होतात.

सेशननुसार चालतो सट्टा बाजार

बुकींनी बेटिंग ॲप तयार केले आहे. या ॲपवरच कस्टमर आयडी तयार करून ऑनलाइन सट्टा लावला जातो. आयपीएलच्या २० ओव्हरमध्ये सेशननुसार सट्टा बाजार चालतो. ओव्हर सेशन, सेशनमध्ये किती रन होणार नाही आणि किती होणार, ही आकडेवारी दिली जाते. त्यानुसार प्रत्येक सेशनमध्ये सट्टा लावला जातो.

नाणेफेकीचा १०० ला १०० भाव

नाणेफेक कोणता कर्णधार जिंकतो, यावर सर्व अवलंबून असते. सामन्यामध्ये नाणेफेक कोण जिंकणार ,यावर सट्टा लावणाऱ्याला १०० ला १०० असा भाव होता. ही रक्कम पटीत कितीही मोठी असू शकते. नाणेफेक हरणाऱ्याला लावलेली रक्कम गमवावी लागते.

ipl betting
Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याचे हाल! शुद्ध पाण्याचे मशिन बसवाण्याची नागरिकांची मागणी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com