Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: ‘रोड शो’द्वारे नाशिककरांशी संवाद, नागरिकांची गर्दी

Rahul Gandhi : भारत जोडो न्याययात्रेनिमित्त नाशिकमध्ये आलेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. १४) द्वारका ते सीबीएसपर्यंत रोड शो करत काँग्रेस नेत्यांना ऊर्जा दिली.
Congress leader MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyayatra arrived in the city of Nashik on Thursday, with crowds gathering to welcome him.
Congress leader MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyayatra arrived in the city of Nashik on Thursday, with crowds gathering to welcome him.esakal
Updated on

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याययात्रेनिमित्त नाशिकमध्ये आलेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. १४) द्वारका ते सीबीएसपर्यंत रोड शो करत काँग्रेस नेत्यांना ऊर्जा दिली. तरुणांशी संवाद साधत केंद्र सरकार बेरोजगारीसह अनेक ज्वलंत मुद्दे सोडून भलतीकडेच लक्ष वेधत असल्याची टीका करीत त्यांनी या सरकारला जागा दाखविण्याचे आवाहन केले. (Nashik Rahul Gandhi Interaction with Nashikkar through Road Show marathi news)

‘इंडिया’ आघाडीची सत्ता आल्यास सर्व गरीब महिलांच्या खात्यावर दर वर्षी एक लाख रुपये जमा करण्यात येतील तसेच जातनिहाय जनगणना प्राधान्याने करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी गाडीतूनच जनतेशी संवाद साधल्याने पदाधिकाऱ्यांचा काहीसा हिरमोड झाला. श्री. गांधी यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावत स्टेज उभारण्यात आले होते. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटानेही पक्ष कार्यालयासमोर त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती.

राहुल गांधी यांनी शालिमार चौकात चौकसभा घेतली. त्या वेळी शिवसेनेच्या नेत्यांना राहुल गांधींच्या रथावर स्वार होण्याची संधी मिळाली. श्री. गांधी यांचे दुपारी नाशिकमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. द्वारका चौक ते शालिमारपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीला अभिवादन करत राहुल गांधी थेट शालिमार चौकापर्यंत पोचले.

येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. जाधव या तरुणास त्याचे नाव विचारले तसेच पोलिस भरतीचे पोस्टर हाती घेऊन उभ्या असलेल्या तरुणांना शांत राहण्याचा सल्लाही दिला. केंद्र सरकार कशा पद्धतीने लोकांच्या खिशातून पैसे काढून अदानींसारख्या बड्या लोकांचे कर्ज माफ करत आहे, याचे उदाहरण त्यांनी दिले.

Congress leader MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyayatra arrived in the city of Nashik on Thursday, with crowds gathering to welcome him.
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: रोड शो मार्गावर पोलिसांचा रुटमार्च! पोलिसांचा फौजफाटा तैनात

काँग्रेसचे शहर सरचिटणीस संतोष (मुन्ना) ठाकूर यांना थेट स्वत:जवळ उभे करून घेत त्यांनी केंद्र सरकार कसे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे, याविषयी माहिती दिली. देशात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीयांचे प्रमाण ९० टक्के असतानाही मुख्य प्रवाहात कुणीच सहभागी नसल्याचे त्यांनी पटवून दिले. राहुल गांधी यांच्या सोबतच्या गाडीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांसह स्थानिक नेते व शिवसेनेचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर, शहराध्यक्ष विलास शिंदे आदी उपस्थित होते.

चेंगराचेंगरी थोडक्यात टळली

राहुल गांधी यांच्या ताफ्यासोबत पोलिस अधिकारी, कर्मचारी व खासगी सुरक्षारक्षक तैनात असल्यामुळे प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. नागरिक राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचू नये, यासाठी नाडा लावला होता. त्यामुळे नागरिकांना चालताना अडचण झाली आणि गंजमाळ सिग्नल ते शालिमारपर्यंत प्रचंड गर्दी झाल्याने शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) कार्यालयासमोर चेंगराचेंगरी होता होता टळली.  ( latest marathi news )

रोड शोदरम्यान गुरुवारी स्वागतासाठी जमलेले नाशिककर.
रोड शोदरम्यान गुरुवारी स्वागतासाठी जमलेले नाशिककर.esakal
Congress leader MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyayatra arrived in the city of Nashik on Thursday, with crowds gathering to welcome him.
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी दौऱ्यासाठी 30 ठिकाणी 116 बॅरिकेटिंग पॉइंट

रोड शोची क्षणचित्रे

- काँग्रेसचे झेंडे, फलकांनी सजले चौक अन् रस्ते

- विविध ठिकाणी उभारलेल्या स्टेजवर नागरिकांची गर्दी

- इंदिरा गांधी, राहुल गांधींचे स्केच, फोटो हाती घेऊन युवकांनी वेधले राहुल गांधींचे लक्ष

- अंनिसचे निवेदन स्वीकारले, त्यातील मुद्दे वाचले

- रोड शोदरम्यान वाहतूक पूर्णत: बंद

-नागरिकांच्या ‘मोदी हटाओ, देश बचाओ’च्या घोषणा

-कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे स्थानिकांना पोलिसांचा मज्जाव

-राहुल गांधींचे छायाचित्र व व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी

-हॉटेल, दुकानांच्या छतावर बसून लोकांनी ऐकले भाषण.

Congress leader MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyayatra arrived in the city of Nashik on Thursday, with crowds gathering to welcome him.
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: बड्यांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com