
इंदिरानगर : मुंबई नाका भागातील हॉटेल छान ते भारतनगर येथील अवघ्या ५०० मीटर रस्त्याचे तीन वर्षांपासून रखडलेले काम किमान सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. ३० मीटर रुंदीचा सुमारे एक ते दीड किलोमीटरचा हा रस्ता हॉटेल छानजवळील सर्व्हिस रस्ता आणि वडाळा- पाथर्डी या ८० फूट रस्त्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे. महापालिकेने तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून सुमारे एक लाख चौरस फुटाचे दिव्यांग केंद्र याच रस्त्यावर बांधले आहे.