

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (ता. २१) थेट एबी फॉर्म दिले आहेत. यात मंत्री छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी मतदारसंघातून व आठवड्यापूर्वीच प्रवेश केलेल्या हिरामण खोसकर यांना इगतपुरी मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे देवळाली, सिन्नर, निफाड व कळवणच्या उमेदवारांना ‘वेटिंग’वर ठेवल्याने याविषयी चर्चांना उधाण आले आहे. ( Bhujbal, Kharwal along with Khoskar distributed IN form by Rashtrawadi )