Vegetables Rates Hike: सर्वच भाज्यांच्या दरांत मोठी वाढ! आठवडे बाजाराला उन्हाचा तडाखा

Nashik News : ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे.
Vegetables
Vegetables esakal

नाशिक : पहाटे कडाक्याची थंडी तर दहानंतर कडक उन्हाचा सामना करावा लागतोय. याची झळ बुधवारच्या आठवडे बाजाराला बसली असून पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांच्या दरांत वीस टक्क्यांच्या आसपास वाढ झाली आहे. (Vegetables Rates Hike) दरम्यान आठवडे बाजारात भुरटे चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (nashik Big increase in all vegetables weekly market hit by sun marathi news)

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणाचा बदल जाणवू लागला आहे. सकाळी सहापर्यंत कडाक्याची थंडी तर दहानंतर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे. त्यातच ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे.

बाजार समितीतील आवक घटल्याने गोदाघाटावरील भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली. त्यामुळे यापुढील काळात गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारात पालेभाज्यांसह फळभाज्या, वेलवर्गीय भाज्यांच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. पुढील काळात उन्हाची तीव्रता वाढणार असून त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत भाज्यांच्या दरांत अजून मोठी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली.

भाजीपाल्याचे दर पुढीलप्रमाणे

१) बटाटे - २० रुपये किलो.

२) लाल कांदा - २० रुपये किलो.

३) टोमॅटो - ४० ते ६० रुपये किलो.

४) वांगी - ४० रुपये किलो.

५) भेंडी - ८० रुपये किलो.

६) गावठी गवार - १२० रुपये किलो.

७) चिनी गवार - १०० रुपये किलो.

८) मेथी (छोटी जुडी ) - १० रुपये

९) पालक (छोटी जुडी) - १० रुपये

१०) कोथिंबीर (छोटी जुडी) - २० रुपये

११) कोबी गड्डा - १५ रुपये

१२) फ्लॉवर गड्डा - २० रुपये (Latest Marathi News)

Vegetables
Nachani Rates Hike: नागलीच्या पापडची चव महागणार! कमी उत्पादनामुळे भावात पायलीमागे 50 रुपयांनी वाढ

भुरट्यांचा धुमाकूळ सुरूच

गंगाघाटावरचा बुधवारचा आठवडे बाजार अन भुरटे चोरटे हे समीकरण पक्के झाले आहे. त्यामुळे दर आठवड्याला बुधवारच्या आठवडेबाजारातून महागडे मोबाईल, पैसे, स्त्रीधन, अन्य दागिणे यांच्या चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याठिकाणी चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याची माहिती काही भाजीविक्रेत्यांनी दिली.

आजही मरिमाता मंदिराजवळ एका महिलेचा मोबाईल व पर्स भुरट्यांनी लांबविल्यावर तिला रडूच कोसळले. काही ओळखीच्या भाजी विक्रेत्यांनी संबंधित महिलेला धीर देत घरी जाण्यासाठी पैसे दिले. येथील भुरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही काळापूर्वी पोलिसांच्या फिरत्या पथकाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे चोऱ्यांनाही आळा बसला होता. परंतु संबंधित अधिकाऱ्याची बदली होताच स्क्वॉडही गायब झाल्याने चोरट्यांना फावत आहे.

Vegetables
Nashik Vegetable Market: भाजीपाल्याच्या आवकेत वाढ! भाजीपाला उत्पादकांचा हिरमोड; उत्पादनापेक्षा लागवडीचाच खर्च पडतोय महागात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com