नाशिक: शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्या. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी वाहनमालकांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना आहे. तर दुसरीकडे ऐन सणासुदीच्या काळात वाहन चोरी होत असल्याने पोलिस गस्त आणि नाकाबंदी कुचकामी ठरते आहे.