नाशिक: बाह्यस्रोतांद्वारे शिक्षक भरतीविरोधात आक्रमक झालेल्या बिऱ्हाड आंदोलकांचा मंगळवारी (ता. १२) संयम सुटला आणि त्यांनी भरती आदेशाची होळी करीत आदिवासी आयुक्तालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना रोखले. मात्र, बुधवारी (ता. १३) सायंकाळपर्यंत या विषयावर निर्णय न झाल्यास आम्ही आयुक्तालयाचे काम बंद पाडू, असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.