भाजपच्या कामावर 'पालकमंत्र्यांकडून' प्रश्नचिन्ह

पालकमंत्री छगन भुजबळ : अनावश्यक कामे रद्द करा
Nashik BJP Cancel unnecessary work Chhagan Bhujbal
Nashik BJP Cancel unnecessary work Chhagan Bhujbal sakal

नाशिक : मी मुंबईत महापौर होतो. स्वायत्त संस्थांच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा नसतो, हे संकेत मी कायम पाळले. पण नाशिक महापालिकेत आर्थिक बेशिस्तीमुळे कर्जाचा बोजा २८०० कोटी झाला आहे. भूसंपादित जमिनीचा काय उपयोग केला, म्हाडा प्रकरणी पूर्वीच्या आयुक्तांवर डाग लागला आहे. त्यामुळे नवीन आयुक्तांनी अनावश्यक कामे रद्द करावीत, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता होती. सध्या लोकप्रतिनिधींची राजवट संपून प्रशासकीय राजवट सुरू आहे. तसेच, काही दिवसांपासून महापालिकेच्या आर्थिक बेशिस्तीमुळे नवनियुक्त प्रशासकांनी काही मंजूर कामे रद्द केली आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी सोमवारी (ता. २५) महापालिकेत साडेतीन तास विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी होते. बैठकीनंतर श्री. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेउन महापालिकेतील आर्थिक बेशिस्तीचा पाढा वाचत महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सत्ताधारी भाजपच्या कामांची लक्तरे चव्हाट्यावर आणली.

सांडपाणी त्वरित रोखा

गोदावरी नदीपात्रात सांडपाण्याचे नाले सोडले आहेत. मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) असूनही सांडपाणी नदीत मिसळते, ती कामे त्वरित करावीत. पाणीपुरवठ्याच्या कामांचा आढावा घ्यावा. रुग्णालयात कोरोनाकाळात कोट्यवधीचा खर्च केला, पण सध्या अनेक यंत्र बंद पडले आहेत. त्यामुळे आउटसोर्सिंग करून सीएसआर फंडातून रुग्णालयाची कामे सुरू करावीत. नंदिनी नदीला नाल्याचे रुप आले आहे, त्यात लक्ष घालावे. उंटवाडी भागातील पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर दिली आहे. पण दुसऱ्याचे काम मात्र थांबविले आहे. दादासाहेब फाळके स्मारकाचे काम खासगी संस्थेला देण्याचे काम थांबविले आहे. इतरही अनेक अनावश्यक कामे स्थगित करणार असल्याचे सांगितल्याचे या वेळी स्पष्ट केले.

भुजबळांचा प्रशासकांना कानमंत्र

  • जुन्या आयुक्तांवर म्हाडा प्रकरणी बालंट

  • मनपात दबावातून कुठलेही कामे होऊ नये

  • नवीन नगरसेवक येईपर्यंत ताण वाढवू नका

  • नाशिकला नुसते सिमेंटचे जंगल वाढवू नका

  • गावठाण- हेरिटेज समित्या कार्यरत कराव्यात

  • जुन्या वास्तूंसह नाशिकचे गावपण जपले जावे

  • म्हाडा सदनिका वाटप विषयात लक्ष घालावे

  • डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय तपासणीत लक्ष द्या

स्थायीतून आर्थिक बेशिस्तीचा पाढा

ज्या स्थायी समितीच्या आर्थिक बेशिस्तीची प्रकरणे पुढे येत आहे. त्याच स्थायी समितीच्या सभागृहात बैठक घेत पालकमंत्री भुजबळ यांनी महापालिकेच्या बेशिस्त कामकाजाविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित केले. ते म्हणाले, की विकासकामावरील खर्चाच्या दीडपट इतके कर्ज असू शकते. पण इथे १५०० कोटीऐवजी २८०० कोटी कर्ज त्यावरील व्याजाचा भूर्दंड बघता महापालिकेचा गाडा आर्थिक दृष्ट चक्रात रुतणार आहे. म्हणून हे गंभीर आहे. नागरिकांना आर्थिक बेशिस्तीचे कारण कळाले पाहिजे. बांधकामांचे वारेमाप काम मंजूर केले आहे. खरोखरच एवढी कामे गरजेची आहे का, हे तपासून प्रशासकांनी अनावश्यक कामे त्वरित रद्द करावीत, त्यासाठी रस्त्यांच्या कामांचा आढावा घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com