Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Electionesakal

Nashik Vidhan Sabha Election : गतिमान विकास हेच भाजपचे ध्येय; भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचा विश्वास

Latest Nashik News : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपचे ध्येय असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
Published on

नाशिक : महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भाजपचा संकल्प असून, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपचे ध्येय असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. भाजपच्या संकल्पपत्राची माहिती देण्यासाठी माध्यम संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार डावखरे बोलत होते. ते म्हणाले, की या संकल्पपत्रासाठी सामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. ८७७ गावांतून ईमेल, पत्रे आली. (BJP MLA Niranjan Davkhare believes that dynamic development )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com