Chandrasekhar Bawankule : निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा फुगा फुटेल! भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Nashik : राज्याच्या राजकारणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मशाल व तुतारीसह संपुष्टात येतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
Chandrasekhar Bawankule (file photo)
Chandrasekhar Bawankule (file photo)sakal

Nashik News : शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणुकीनंतर फुटणार असून, त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मशाल व तुतारीसह संपुष्टात येतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Nashik Chandrashekhar Bawankule)

पाचव्या टप्प्यातील मतदानात २०१९ पेक्षा अधिक जागांनी आम्ही जिंकू, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित आहे.

त्याचबरोबर शरद पवार यांनी राज्यामध्ये तयार केलेला महाविकास आघाडीचा फुगा ४ जूननंतर फुटणार असून, महाविकास आघाडीचे तुकडे तुकडे होतील. त्याचबरोबर राज्यातील दोन्ही पक्ष संपुष्टात येतील. मशाल व तुतारी हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर राज्यात दिसणार नाहीत. (latest marathi news)

Chandrasekhar Bawankule (file photo)
Nashik PM Narendra Modi : शहर-जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्याची शक्यता; मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, की राऊत यांना पराभवाचे लक्षण दिसत आहे. त्यामुळे त्यांनी केलेली वक्तव्य हे साधारण आहे ते बोलतच राहणार. जसजसा पराभव जवळ येईल त्याप्रमाणे ईव्हीएम खराब आहे, मशिनच खराब झाली, मशिनमध्ये दोष आहे, असे आरोप होतील.

घोटाळ्याचे आरोप फेटाळले

खासदार राऊत यांनी नाशिक महापालिकेत आठशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप केला. येत्या काही दिवसांत हा घोटाळा आपण बाहेर काढू, असा इशारा दिला आहे. यावर बावनकुळे यांनी राऊत यांचे आरोप फेटाळताना त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. राऊत हे सध्या काहीही बरगळत सुटले आहे. त्यांच्या प्रश्नांना किंवा आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही.

Chandrasekhar Bawankule (file photo)
Nashik News : नाव मागेल त्याला, शेततळ्याला खिशातून पैसे घाला! अनुदानात वाढीची शेतकऱ्यांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com