Nashik PM Narendra Modi : शहर-जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्याची शक्यता; मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

PM Narendra Modi : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या बुधवारी (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा होते आहे.
Notice
Notice esakal

Nashik PM Narendra Modi : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या बुधवारी (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा होते आहे. सध्या जिल्ह्यात कांदाप्रश्नी शेतकरी व काही संघटना आक्रमक असल्याने सभास्थळी त्यांच्याकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्र्वभूमीवर शहर-जिल्हा पोलिसांकडून संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजाविल्या जातील, तर काहींना नजरकैदही केली जाण्याची शक्यता आहे. ( Possibility of issuing preventive notices in city district)

तसेच, कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून पोलिसांसह गोपनीय शाखा अलर्ट मोडवर आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे हेमंत गोडसे तर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, येत्या २० तारखेला दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे आगामी पाच-सहा दिवस हे शहर-जिल्ह्यात नेत्यांच्या सभा होणार आहेत.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी (ता.१५) पिंपळगाव बसवंत याठिकाणी होते आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, जादा पोलीस कुमकेसह केंद्रीय राखीव दल व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. पोलिसांच्या गोपनीय शाखा सतर्क झाल्या असून, शहर-जिल्ह्यातील लॉजेस्‌, हॉटेल्स, गर्दीची ठिकाणे, बसस्थानक, रेल्वेस्थानक याठिकाणी करडी नजर ठेवून सातत्याने तपासणी केली जात आहे. (latest marathi news)

Notice
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा; दोन दिवसात सहा सभा...

दरम्यान, जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना कांदाप्रश्नांवरून शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी आंदोलक शेतकरी व संघटनांच्या पदाधिकार्यांकडून काळे झेंडे दाखविणे, आंदोलन करून घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर-जिल्हा पोलिसांकडून अशा आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाण्याची वा नजरकैद केले जाण्याची शक्यता आहे.

देसलेंना केले होते नजरकैद

नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी किसान सभेचे राजू देसले यांना पंचवटी पोलिसांनी नजरकैद केले होते तर अनेकांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजाविल्या होत्या.

पोलिसांकडून सतर्कता

- महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, लॉजेसची तपासणी

- लॉजेसवर निवासाला येणार्यांची तपासणी

- रेल्वेस्थानक, बसस्थानकांवर करडी नजर

- पंतप्रधानांच्या मार्गावर नियमित तपासणी

Notice
PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com