नाशिक: शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या जुलैमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, जुलैमध्ये शहर आयुक्तालय हद्दीत ३८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात तब्बल ७८ लाखांचा ऐवज लांबविला. यातील अवघ्या दोन घरफोड्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे.