Nashik Accident : अनेकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग; तातडीने दिले आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bus Accident

Nashik Accident : अनेकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग; तातडीने दिले आदेश

नाशिकमध्ये झालेल्या बस अपघातामध्ये १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावेळी स्थानिक प्रशासनाची उदासिनता दिसून आली. अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळानंतर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. यानंतर आता स्थानिक प्रशासन खडबडून जागं झाल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचा: Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण

या अपघातानंतर नागरिक संतप्त आहेत. आत्तापर्यंत या चौकामध्ये अनेक अपघात झाले आहे. अशा अपघातांमध्ये १८ जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी या तातडीने या चौकातली अतिक्रमणं काढण्याचे आदेश दिले आहेत. तसंच स्पीड ब्रेकर बसवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हेही वाचा: Nashik Accident: यंत्रणा ठरल्या फोल; दीड तास कोणी फिरकलंच नाही!

पहाटे साडेचार पाचच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही नागरिकांनी तातडीने अँब्युलन्स, अग्निशमन दलाला फोन केले. पण सकाळी सहा वाजेपर्यंत कोणीही घटनास्थळी पोहोचू शकलं नाही. अखेर पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी जखमींना तसंच मृतांनाही शहर बसमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे आपत्कालिन व्यवस्था फोल ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

टॅग्स :Nashikbus accident