Nashik Bus Accident : नाशिकमध्ये अग्नितांडव सुरूच; पुन्हा एक बस पेटली, Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Nashik Bus Accident : नाशिकमध्ये अग्नितांडव सुरूच; पुन्हा एक बस पेटली, Video Viral

नाशिक : नाशिकमध्ये अपघातानंतर पेटलेल्या बसमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळीच घडली असताना पुन्हा एका बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सप्तश्रृंगी (वणी) गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आग लागली आहे. ही घटना सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली असून स्थानिकांनी आणि प्रशासनाने मिळवून आग विझवली आहे तर या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

(Nashik Bus Fire Accident News Updates)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला आहे. तर परिवहन महामंडळाच्या या बसचे मोठे नुकसान झाले असून कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर मार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. तर आज सकाळीच नाशिकमधील नांदूर नाका येथे झालेल्या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० जण मृत्यूमुखी पडले आहेत.

दरम्यान, आज पहाटे नाशिक येथील नांदूर नाका येथे खासगी बसचा अपघात झाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 30 ते 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर अनेक स्थानिकांनी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही. त्यांनी प्रशासन व्यवस्थेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे घटनेमध्ये जास्त मृत्यू झाल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं. तर अधिकचा तपास चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

टॅग्स :NashikfireFire Accident