
नाशिक : गुन्हा दाखल न करण्यासाठी दोघांकडे ५० हजारांच्या लाचची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार गेल्या डिसेंबर २०२३ मध्ये घडला असून, नाशिक रोड पोलिस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक निरीक्षक गणेश किसन शेळके (वय ३७, रा. नाशिक) हे सध्या ठाणे शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.