
मालेगाव : जिल्ह्यात मालेगाव मध्ये विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सर्वात उत्कंठावर्धक ठरली. क्षणक्षणाला मतदानाचा लोलक झुलता होता. पहिल्या काही फेरीत अपक्ष उमेदवार माजी आमदार आसिफ शेख आघाडीवर होते. पंधराव्या फेरीनंतर त्यांच्या आघाडीला एमआयएमचे उमेदवार आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी सुरुंग लावला. काट्याची टक्कर झालेल्या या ठिकाणी फेरमतमोजणी नंतर मौलाना मुफ्ती विजयी झाले.