Central Government ULLAS: केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात नवसाक्षरांची रविवारी लेखी परीक्षा!

Nashik News : या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळास्तरीय समित्यांची स्थापना केली आहे.
A guide book prepared for Sunday examination of new literates.
A guide book prepared for Sunday examination of new literates. esakal

इगतपुरी : देशात पाच कोटींहून अधिक लोक निरक्षर असून, त्यांना साक्षर करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी (ता. १७ ) होणार आहे.

राज्यात आतापर्यंत सहा लाख २० हजार असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्र शासनाकडे झाली असून, त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान पाच लाखांहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत.त्यामुळे नातवंडांसह आता आजी-आजोबाही अभ्यासात सध्या मग्न आहेत. (Nashik Central government sponsored Ullas Nav Bharat Literacy program marathi news)

राज्य सरकारने १४ ऑक्टोबर २०२२ला ही योजना स्वीकारली आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळास्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे, ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. नोंदणीकृत असाक्षरांनी रविवारी त्या शाळेत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

अशी होईल परीक्षा

प्रश्नपत्रिका पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाशी संबंधित पुढील तीन भागांत विभागली असून, एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग,(संख्याज्ञान) ५० गुण आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. (latest marathi news)

A guide book prepared for Sunday examination of new literates.
Simhastha Kumbh Mela : रामतीर्थ, त्र्यंबकेश्‍वरमधील अतिक्रमण हटविणार; गिरीश महाजन यांची अधिकाऱ्यांना सूचना

कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण मिळू शकतील. तीनही भागांचे मिळून पाचपेक्षा जास्त ग्रेस गुण मिळणार नाहीत. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा असेल. (दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल.

ही परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यामातून व्यक्तीमध्ये विविध जीवनकौशल्ये विकसित होतील, तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

जिल्हानिहाय निरक्षरांची संख्या

जिल्हा : निरक्षर संख्या

नाशिक : ८ लाख ६० हजार २५८

जळगाव : ७ लाख ३४ हजार ३३५

नगर : ७ लाख ८४ हजार ३२४

पालघर : ६ लाख ८१ हजार ५७३

A guide book prepared for Sunday examination of new literates.
Nashik News : सटाणा उपजिल्हा रुग्णालयासाठी 76 कोटी मंजूर! स्थानिक पातळीवर अत्याधुनिक सुविधा मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com