Medical officers and staff with the delivery mother at the health center.esakal
नाशिक
Nashik News : 5 महिन्यांत सामान्य प्रसुतीचे शतक! पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्राची लक्षणीय कामगिरी
Nashik News : गरोदर मातांच्या कुटुंबियांचा पिंपळगाव आरोग्य केद्रांतवर विश्वास वृद्धीगंत झाल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे.
पिंपळगाव बसवंत : प्रसुती हे बालकांबरोबरच मातेलाही नवा जन्म अन् आनंदाचा ठेवा देऊन जाते. प्रसुतीच्या कळा सहन करताना पिंपळगाव आरोग्य केद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळ-बाळंतीण सुखरूप ठेवण्याची लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या पाच महिन्यांत पिंपळगाव बसवंत आरोग्य केद्रांत १०४ मातांनी सामान्य प्रसुतीद्वारे बालकांना जन्म दिला आहे.
त्यामुळे गरोदर मातांच्या कुटुंबियांचा पिंपळगाव आरोग्य केद्रांतवर विश्वास वृद्धीगंत झाल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. या आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, रूग्णवाहिका चालक, आशा कार्यकर्तींच्या सामूहिक सेवा, कर्तव्याचा परिणाम म्हणून पाच महिन्यांत सामान्य प्रसुतीचे शतक पूर्ण झाले आहे. (Significant achievements of Pimpalgaon Baswant Health Centre)

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)