Nashik Water Supply Scheme: चणकापूरचे पाणी पोचले तळवाडे तलावात! 52 पाणीपुरवठा योजनांना दिलासा

Nashik News : आवर्तनाचा फायदा मालेगावसह कसमादेतील लहान, मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना होणार आहे.
Water Supply
Water Supply esakal

मालेगाव : चणकापूर धरणातून पिण्यासाठीचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तनाचा फायदा मालेगावसह कसमादेतील लहान, मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला होता.

नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. आवर्तन सोडण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे मार्चअखेर आवर्तन सोडण्यात आले. मालेगाव महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात पाणी पोचले आहे. तळवाडे तलावासह दाभाडी बारागाव योजनेचा तलाव देखील भरुन घेतला जाणार आहे. (Nashik Chankapur water reach Talwade Lake marathi news)

मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. कसमादे परिसरात गेल्यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसला तरी चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनंद ही धरणे ओव्हरफ्लो झाली तर गिरणा धरण ५५ टक्के भरले होते. चणकापूर धरणातून जानेवारीमध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी संयुक्त आवर्तन सोडण्यात आले होते. या आवर्तनावरुन मोठा गोंधळ उडाला. काष्टी व परिसरातील लाभार्थ्यांना पाणी न देता मोठ्या शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्याचा आरोप पाटबंधारे विभागावर करण्यात आला होता.

दुष्काळी परिस्थितीमुळे चणकापूर धरणावर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला होता. अनेक गावांमध्ये आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर नळांना अर्धा तास देखील पाणी येत नाही. या भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. मालेगावचा पारा ४२ अंशावर पोचला आहे. (latest marathi news)

Water Supply
Nashik Water Crisis : नामपूरला पाण्यासाठी नागरिकांची वणवण! शहराला 7 दिवसातून एकदा पाणी

ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न देखील तीव्र होत आहे. या पाश्‍र्वभूमीवर चणकापूरमधून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आवर्तन सोडण्यात आले आहे. विविध योजनांचे जलसाठे भरून घेतले जात आहेत.

गिरणा नदीपात्राद्वारे डाव्या कालव्याच्या माध्यमातून मालेगाव महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात पाणी पोचले आहे. तलावाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. आणखी चार दिवसात तलाव पूर्ण भरेल. दाभाडीसह बारागाव योजनेचा साठवण तलाव देखील भरून घेतला जात आहे. आवर्तन आठवडाभर सुरु राहील. आवर्तनाचे पाणी किमान दीड महिने पुरवावे लागणार आहे. विविध धरणांमधील उपलब्ध जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Water Supply
Nashik Water Crisis : शेणवड बुद्रुकच्या ‘जलजीवन’चे तीनतेरा! आदिवासी महिलांना भरावे लागतेय झिऱ्यातील गढूळ पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com