Nashik News : ‘सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये जऊळके विभागात प्रथम

Nashik : मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत नाशिक विभागात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात जऊळके (ता. दिंडोरी) शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
principal, teacher of school at Jaulke While accepting prize from Chief Minister Eknath Shinde, Education Minister Deepak Kesarkar
principal, teacher of school at Jaulke While accepting prize from Chief Minister Eknath Shinde, Education Minister Deepak Kesarkaresakal

Nashik News : मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत नाशिक विभागात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटात जऊळके (ता. दिंडोरी) शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जऊळके शाळेला २१ लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज मुख्यमंत्री शिंदे, शिक्षणमंत्री केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झाले. (Nashik Chief Minister My School Beautiful School competition Jaulke School won first place in Nashik division)

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देवल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील, विक्रम काळे उपस्थित होते. शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणांच्या आधारे जिल्ह्यातील शाळांचे परिक्षण करण्यात आले.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. (latest marathi news)

principal, teacher of school at Jaulke While accepting prize from Chief Minister Eknath Shinde, Education Minister Deepak Kesarkar
Nashik News: इस्‍पॅलियर हेरिटेज स्‍कूलचा सन्मान; मुख्यमंत्री शिंदेंच्‍या हस्‍ते राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्रदान

जऊळके शाळेला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल.

शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी जऊळके शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जोपळे, शिक्षक किरण कापसे, कमल देवरे, कल्याणी वाशिकर, उत्तम भोये, हरिभाऊ बच्छाव, नरेंद्र सोनवणे, सुप्रिया धोंडगे, विद्यार्थी व पालक व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

principal, teacher of school at Jaulke While accepting prize from Chief Minister Eknath Shinde, Education Minister Deepak Kesarkar
Nashik Adivasi Morcha : आता माघार, पण पुन्हा लढ्याचा निर्धार; पालकमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com