
नाशिकरोडः जेवताना नऊ वर्षांच्या मुलाच्या घशात काहीतरी अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आईने खांद्यावर खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी अत्यवस्थ मुलाला बिटको रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. भाजपचे पदाधिकारी भूषण शहाणे यांनी मातेला अत्यवस्थ मुलासह दुचाकीवरून बिटको रुग्णालयात पोहोचवले. मात्र तोपर्यंत मुलाने मातेच्या खांद्यावरच प्राण सोडले.