

येवला : नायलॉन मांजामुळे सर्वसामान्यांची शिकार होण्याच्या घटनेत रोजच वाढ होत असून, आज पुन्हा एका चिमुरड्याचा हात कापून १८ टाके पडले आहेत. आतापर्यंतची ही पाचवी घटना असून, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच सुकी रोडवर एका पोलिसपाटलाचा गळा, ओठ कापून ४० टाके पडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता. २६) पुन्हा एका मुलाला मांजाने आपली शिकार केली.