
नाशिक रोड : भारत सरकारची सध्या ऑनलाइन प्रणालीकडे वाटचाल सुरू असतानाही पासपोर्टबरोबरच आता देशातील उद्योग-व्यवसायांची सुरक्षा पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ई-सर्व्हिस बुक पोर्टल जारी करण्याची घोषणा केली आहे. देशभरात या दलातून दर वर्षी निवृत्त होणाऱ्या दोन हजार ४०० जवानांना या पोर्टलचा आणि ई-सर्व्हिस बुकचा लाभ होणार आहे. नाशिक रोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस आणि करन्सी प्रेसमध्ये या दलाचे ७५० जवान कार्यरत आहेत.