Nashik News : प्लॅस्टिक कचरा पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी; चेंबर व त्यावरील जाळींची स्वच्छतेची नागरिकांची मागणी

Nashik : सरकारची प्लॅस्टिकबंदी केवळ कागदावरच राहिली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षाने प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत आहे.
Plastic waste lying on the road.
Plastic waste lying on the road.esakal

Nashik News : सरकारची प्लॅस्टिकबंदी केवळ कागदावरच राहिली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षाने प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत आहे. मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा निघत आहे. हाच कचरा पावसाळ्यात नाशिककरांची डोकेदुखी ठरणार आहे. प्लॅस्टिक कचरा पावसाळ्यात पावसाळी गटर, चेंबर, नाले तसेच नाल्यांवरील लोखंडी जाळीत अडकत असल्याने पावसाळी पाणी जाण्यास मार्ग राहात नाही. ( Citizen demand for cleanliness of chamber and nets from nmc )

रस्त्यावरच पाणी साचत असते. त्यामुळे अनेक भागात पाणी साचून नदीचे स्वरूप येते. सराफ बाजार, दहीपूल परिसर, सरस्वती नाला परिसर, तसेच दूध बाजार या भागात अशा परिस्थिती पावसाळ्यात नित्याचीच आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होणे, नागरिकांना आरोग्याच्या समस्या, वाहतुकीचा मार्ग बंद होणे अशा अनेक समस्या उद्‍भवत असतात.

Plastic waste lying on the road.
Nashik News : पावसाची विश्रांती, तापमानात वाढ! कमाल तापमान पुन्‍हा 40 अंशांच्‍या उंबरठ्यावर

महापालिकेकडून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केल्यास अशा घटनांना आळा बसेल. आजही अनेक भागात, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा रस्त्यावर पडून असल्याचे आढळून येते. पावसाळ्यात प्लॅस्टिक कचरा अडकून ठिकठिकाणी पाणी साचत असते.सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याने सरकारची प्लॅस्टिक बंदी केवळ कागदावरच राहिली आहे.

जाळी, चेंबर स्वच्छतेकडे दुर्लक्ष

अवघ्या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला आहे. तरी देखील पावसाळी कामे झालेली दिसून येत नाही. अनेक ठिकाणी चेंबर भरून वाहत आहे. नाल्यांवरील जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा अडकून पडलेला आहे. काही ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी चेंबरवरील ढापे, जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहे. पावसाळी नाले, चेंबर, गटर, त्यावरील जाळींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Plastic waste lying on the road.
Nashik News : शरद पवार- सुनील तटकरे यांची भेट! माजी मंत्री अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com