केवळ पेट्रोल मिळविण्यासाठी नाशिककरांची अनोखी शक्‍कल!

nashik
nashikesakal

नाशिक : रस्‍ते अपघातात (road accident) होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण घटविण्याच्‍या प्रामाणिक हेतूने पोलिस दलातर्फे (nashik police) ‘नो हेल्‍मेट, नो पेट्रोल’ (no helmet no petrol) च्‍या अंमलबजावणीला रविवारी (ता.१५) स्‍वातंत्र्य दिनापासून (indepedence day) सुरुवात केली. मात्र या मोहिमेचा उद्देश समजून न घेता नाशिककर वेगवेगळ्या शक्‍कल लढवताना दिसले.

मोहिमेचा उद्देश समजून न घेता नाशिककरांच्या विविध शक्‍कल

पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांच्‍या संकल्‍पनेतून अभिनव उपक्रमाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे काही बेशिस्‍त वाहनचालक मात्र हेल्‍मेट वापराविषयी गंभीर नसल्‍याचे दिसत आहे.केवळ पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळविण्यापुरता हेल्‍मेट वापरताना, रस्‍त्‍यांवर मात्र विनाहेल्‍मेटच दुचाकीस्‍वार सुसाट असल्‍याचे दृश्य बघायला मिळाले. ‘नो हेल्‍मेट, नो पेट्रोल’ च्‍या अंमलबजावणीला स्वातंत्रदिनापासून सुरुवात झाली आहे. पंपचालकांकडून या संदर्भात जनजागृतीकरिता आवारात फलक लावण्यात आले आहेत. तसेच पेट्रोलपंप चालकांकडून विनाहेल्‍मेट पेट्रोल देण्यास नकार दिला जातो आहे. अशात हेल्‍मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्‍वारांकडून विविध शक्‍कल लढविल्‍या जात असल्‍याचे ठिकठिकाणी बघायला मिळाले. वाहनासोबत हेल्‍मेट बाळगत, पंपावर प्रवेश करताना हेल्‍मेट परिधान करणारे महाभाग आढळून आले. तर हेल्‍मेट नसल्‍याने काहींनी पंपावर असलेल्‍या अन्‍य हेल्‍मेट परिधान केलेल्‍या दुचाकीस्‍वाराकडून इंधन भरण्यापुरता हेल्‍मेटची मागणी केल्‍याचीही दृश्य बघायला मिळाले. या मोहिमेच्‍या गांभीर्याची जाणीव अद्यापही अनेक दुचाकीस्‍वारांना झालेली नसल्‍याचे यातून निदर्शनात आले आहे.

nashik
येवला प्रांताधिकाऱ्यांची महिला तलाठीकडे शरीरसुखाची मागणी

दोनच मिनिटांसाठी हेल्‍मेट नेतो..

त्र्यंबकरोडवरील अशाच एका पंपानजीक सातपूर पोलिस ठाणे आहे. हेल्‍मेटविना पेट्रोल मिळत नसल्‍याने एक अतिहुशार दुचाकीस्‍वाराने थेट पोलिस ठाण्याला लागून असलेल्‍या वाहनतळात गाडी आणली. येथे उभ्या असलेल्‍या अन्‍य दुचाकीला लावलेले हेल्‍मेट घेत ‘दोन मिनिटांत पेट्रोल भरून आणून देतो’ असे म्‍हणत गाडी पुन्‍हा पंपात नेली. पेट्रोल भरून झाल्‍यावर हेल्‍मेट पुन्‍हा दुचाकीला लावत निर्धास्तपणे चालला गेल्‍याचा विनोदी किस्सा सोमवारी (ता.१६) बघायला मिळाला.

काही दुचाकीस्‍वारांकडून नियमाचे काटेकोरपणे पालन

काही दुचाकीस्‍वारांकडून ‘नो हेल्‍मेट, नो पेट्रोल’ उपक्रमानिमित्ताने हेल्‍मेट वापरास सुरुवात केल्‍याचेही बघायला मिळाले. यापूर्वी हेल्‍मेट परिधान न करणाऱ्या चालकांकडून इंधन भरतानाच नव्‍हे तर रस्‍त्‍यावरही वाहन चालविताना हेल्‍मेटचा वापर झाला. मात्र अशा दुचाकीस्‍वारांचे प्रमाण अत्‍यंत कमी राहिले.

कठोर अंमलबजावणीची शक्‍यता

नाशिककरांकडून लढविलेल्‍या वेगवेगळ्या शक्‍कलींची दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. या सर्व पळवाटांच्‍या संदर्भात पोलिसांकडून विविध स्वरूपातील कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. आगामी काळात कठोर अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना केल्या जाणार असल्‍याचे समजते.

nashik
परदेशातील बाजारपेठेतील प्रश्‍न कांदा उत्पादकांच्या मुळावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com