Nashik News : पावसाळापूर्व कामे रखडल्याने नागरिक वेठीस; उंच, सखल भागातील ड्रेनेज, नालेसफाई बाकी

Nashik : सराफ बाजार भागातील पावसाळापूर्व कामे रखडल्याने ऐन पावसाळ्यात पुन्हा परिसरातील नागरिक वेठीस धरले जाणार आहे.
Drainage water accumulated in the Ganjmal signal area as vehicles make their way through it. In the second photo, the sewage accumulated in front of the house in Bhimwadi area
Drainage water accumulated in the Ganjmal signal area as vehicles make their way through it. In the second photo, the sewage accumulated in front of the house in Bhimwadi areaesakal

Nashik News : परिसरातील उंच भागात असलेल्या बुधवार पेठ, कुंभारवाडा, काझीपुरा आणि सखल भागातील दूध बाजार, सोमवार पेठ, दहिफुल परिसर, सराफ बाजार भागातील पावसाळापूर्व कामे रखडल्याने ऐन पावसाळ्यात पुन्हा परिसरातील नागरिक वेठीस धरले जाणार आहे. आत्तापासूनच अवकाळी पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे सांडपाणी तुंबण्याच्या घटना काही भागात घडत आहे. त्यात मुख्य बाजारपेठेचाही समावेश आहे. नागरिक, व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ()

दरवर्षी महिनाभर अगोदरपासून पावसाळापूर्व कामांना वेग येत असतो. असे असताना जुने नाशिकसह मुख्य बाजारपेठेत पावसाचे पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. यंदा मात्र अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना देखील कुठेही पावसाळी कामे होताना आढळून येत नाही.

विशेष करून नाले, ड्रेनेज साफसफाई करून पावसाच्या पाण्यात वाट मोकळी करून दिली जात असते. यावेळेस पावसाळी कामे झाली नसल्याने पाणी साचण्याची समस्या आणखी गंभीर होणार आहे. त्याचप्रमाणे चेंबर, चेंबरवरील लोखंडी जाळ्यांची स्वच्छता, तुटलेले ढापे बदलण्याची कामे अशी कुठलीही कामे झाली नसल्याने पावसाळ्यात यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

काझीगढीस संरक्षण भिंतीची प्रतीक्षा

पावसाळापूर्व कामात काझीगढीवासियांचे संरक्षण प्राथमिकता आहे. त्याकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्लक्ष करण्यात येत असते. याहीवर्षी अशीच काहीसे चित्र आहे. अजूनही गढीस संरक्षण भिंत बांधण्याची प्रतीक्षा कायम राहिली आहे. प्रशासनातर्फे नोटीस बजावण्याचा सोपस्कार मात्र केला जात आहे. थोडी थोडी करत अर्धी काझीगढी ढासळलेली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आतापासूनच येथील रहिवाशांमध्ये धडकी भरली आहे. (latest marathi news)

Drainage water accumulated in the Ganjmal signal area as vehicles make their way through it. In the second photo, the sewage accumulated in front of the house in Bhimwadi area
Nashik News : गिरणार नदीपात्रात तरुण बुडाला; अंधार पडल्याने शोधकार्य थांबविले

धोकादायक वाड्यांची समस्या कायम

जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर जुने धोकादायक वाडे आहेत. रहिवासी भागांसह मुख्य बाजारपेठेतील धोकादायक वाडे दुर्घटनेस निमंत्रण देत आहे. गेल्यावर्षी मेनरोड मुख्य बाजारपेठेत अशाच प्रकारे धोकादायक वाड्याचा भाग कोसळण्याची घटना घडली होती. वाडे रिकामे करण्यासह धोकादायक अवस्थेत असलेले वाडे उतरविण्याचे कुठलेही ठोस नियोजन करण्यात आले नसल्याने धोकादायक वाड्यांची समस्या आजही कायम आहे.

बाजारपेठेतील व्यावसायिक हवालदिल

सरस्वती नाला परिसर, दहिपूल, सराफ बाजार अशा मुख्य बाजारपेठेत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून नदीचे स्वरूप येत असते. व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान होत असते. सरस्वती नाला अतिशय पुरातन नाला आहे. नाल्याचा घेर वाढवण्यात आलेला नाही.

लोकवस्ती वाढल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. शिवाय पावसाचे पाणी यामुळे नाल्याची क्षमता कमी पडते. त्यातच नाल्यावर भद्रकाली परिसरात व्यावसायिकांच्या दुकानांचे बांधकाम असल्याने नाल्याची क्षमता वाढविण्यास अडचण येत आहे. त्यामुळे जुने टॅक्सी स्टँड परिसरात आणि दूध बाजारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचते. यावर्षी याचीही सफाई न झाल्याने पाण्याची समस्या आणखी तीव्र होणार आहे.

Drainage water accumulated in the Ganjmal signal area as vehicles make their way through it. In the second photo, the sewage accumulated in front of the house in Bhimwadi area
Nashik News : यंदाच्या खरिपात बळीराजाला ‘अच्छे दिन’ची अपेक्षा!

भीमवाडी समस्यांचे माहेरघर

परिसरातील भिमवाडी, श्रमिकनगर, खडकाळी परिसरात पावसाचे पाणी साचून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळापूर्व कामे झाली नसल्याचे उदाहरण भीमवाडीत दिसून येत आहे. संपूर्ण भागात घरांसमोर सांडपाणी साचले आहे. तर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल न सांगणे योग्य राहील, खडकाळी सिग्नल परिसरातही चेंबर तुंबल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे.

या भागात साचते पाणी

सराफ बाजार, दहीपूल, नेहरू चौक, सरस्वती नाला परिसर, दूध बाजार, जुने टॅक्सी स्टँड, खडकाळी, मेनरोड, भिमवाडी, श्रमिकनगर, द्वारका भुयारी मार्ग, टाळकोटेश्वर अमरधाम परिसर, नानावली, शालिमार.

''पावसाळापूर्व कामांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यंदाही आम्हास नुकसानास सामोरे जावे लागणार असे वाटत आहे. अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. चेंबरवरील जाळ्यांची स्वच्छता करावी.''- बंडू गंगावणे, व्यवसायिक.

''भिमवाडीतही माणसे राहत आहे. सध्याही सांडपाणी घरांच्यासमोर साचले आहेत. पावसाळी पूर्वी कामे झाली नसल्याने पावसाळ्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील चेंबर, ड्रेनेजची स्वच्छता करण्यात यावी.''- सचिन गायकवाड, रहिवासी.

Drainage water accumulated in the Ganjmal signal area as vehicles make their way through it. In the second photo, the sewage accumulated in front of the house in Bhimwadi area
Nashik News : आश्रमशाळांत पहिल्याच दिवशी गणवेश; ‘आदिवासी विकास’कडून खरेदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com