नाशिकमध्ये शहर बससेवेला हिरवा झेंडा; ऑगस्ट पासून सेवा सुरु

nashik bus
nashik busesakal

नाशिक : गेल्या अडीच वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे हेलकावे खाणाऱ्या शहर बससेवेला परिवहन विभागाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर आता महापालिकेने बससेवा सुरु करण्याच्या हालचाली गतिमान केल्या असून, पुढील आठवड्यात सेवा सुरु करण्यासाठी बैठक होणार आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टमध्ये बससेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली..

(Nashik city bus service starts from August)

पहिल्या टप्प्यात ५० बस धावणार

राज्य परिवहन महामंडळाकडून शहर बससेवा बंद करून त्याऐवजी महापालिकेकडून बससेवा सुरु केली जाणार आहे. ग्रॉस कॉस्ट कटिंग तत्त्वावर बससेवा सुरु करताना महापालिकेला अनेक अडथळे पार पाडावे लागले. शासनाचा ना हरकत दाखला व परिवहन विभागाकडून टप्प्यांचे दर निश्‍चित करण्याची प्रक्रिया प्रलंबित होती. मंगळवारी (ता. २) परिवहन विभागाने टप्प्यांच्या दराला मंजुरी दिल्यानंतर महापालिकेच्या बससेवेचा मार्ग मोकळा झाला. मे. ट्रॅव्हल टाइम कार रेंटल प्रा.ली. पुणे व मे. सिटी लाइफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा. ली. दिल्ली यांची ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली. बस ऑपरेटर सोबतच बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी दहा वर्षांचा करारनामा करण्यात आला. तीस मिनी डिझेल व १२० सीएनजी, वीस डिझेल (Diesel) व ८० सीएनजी (CNG) बसला मंजुरी देण्यात आली. बसडेपोसह शेल्टर उभारणीचे काम सध्या सुरु आहे. परिवहन विभागाने भाडे टप्प्यांना मंजुरी दिल्यानंतर आता पुढील आठवड्यात बससेवा सुरु करण्यासंदर्भात आयुक्त बैठक घेणार आहे. त्यानंतर बससेवा सुरु करण्याची तारीख निश्‍चित करून सेवा सुरु केली जाणार आहे. विलंब लागला तरी चालेल परंतु एकदा सेवा सुरु झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्याने पायाभूत तयारी पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात सेवा सुरु होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बससेवा सुरु होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

nashik bus
जागतिक पर्यावरण दिन : नाशिकमध्ये मुरमाड जागेवर बहरली वनराई!

टप्प्याटप्याने संख्या वाढविणार

पहिल्या टप्प्यात ० ते २ किलोमीटर अंतरासाठी दहा रुपये पूर्ण आकार, पाच रुपये अर्ध आकार, तसेच कमाल पन्नास किलोमीटर पर्यंतच्या टप्प्यात ६५ रुपये पूर्ण तर ३५ रुपये अर्ध भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्य परिवहन महामंडळाकडून एकाच वेळी सेवा बंद केली जाणार नाही. महापालिका पहिल्या टप्प्यात पन्नास बसेस रस्त्यावर उतरविणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने बसची संख्या वाढविणार आहे.

(Nashik city bus service starts from August)

nashik bus
सातवाहनकालीन नाण्यांवर मोहाच्या वृक्षाचे चिन्ह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com