नाशिक- पुरातन वाडे असलेल्या जुने नाशिक परिसरातील गावठाणाचा भाग असो किंवा शहरातील विकसित भागांतील उंच इमारती असो. सर्वत्र उभारलेली मांगल्याची गुढी लक्षवेधी ठरली. रविवारी (ता. ३०) गुढीपाडव्यानिमित्त थोरामोठ्यांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरली होती. आप्तस्वकियांना प्रत्यक्ष, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.