
नाशिक : शहरात नायलॉन मांजाविरोधात बंदी असतानाही पतंग उडविणाऱ्यांच्या हाती नायलॉन मांजा आढळून येत असल्याने शहर पोलिसांनी अशा पतंगबाजांना हेरण्यासाठी साध्या वेशात इमारतींचे टेरेस गाठत कारवाईचा धडाका लावला. मंगळवारी (ता. १४) सकाळपासूनच सिडकोसह पंचवटी व शहरात पोलिसांनी २१ गुन्हे दाखल करीत चार पालकांसह १५ जणांना अटक केली. दिवसभरात पालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत.