Nashik Citylinc Employees Strike : दुसऱ्या दिवशीही सिटीलिंक वाहकांचा संप सुरूच; दिवसभर प्रवाशांचे हाल

Nashik Citylinc Employees Strike : सिटीलिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने वाहकांना नेहमीच आंदोलन करावे लागत आहे.
Nashik Citylinc Employees Strike (file photo)
Nashik Citylinc Employees Strike (file photo)esakal

Nashik Citylinc Employees Strike : नाशिक महापालिकेने मोठा गाजावाजा करीत शहर बससेवा सुरू केली. सिटीलिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने वाहकांना नेहमीच आंदोलन करावे लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून थकलेले वेतन, पीएफ, इएसआयसी रक्कम पगारातून कपात करून खात्यावर जमा न करणे या मुद्द्याहून गुरुवारी (ता. १४) सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी केलेले काम बंद आंदोलन शुक्रवार (ता.१५) सुरू आहे. (Nashik Citylinc carrier strike continues for second day)

जवळपास १५३ वाहक सहभागी झाले आहेत. संपावर सायंकाळ सहापर्यंत काही तोडगा निघालेला नसल्याने प्रवाशांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, यात जवळपास नाशिक रोड डेपोतील बस सुरू असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नाही.

वेतनातून कपात केलेली पीएफ, इएसआयसी रक्कम खात्यावर जमा करत नाही या मुद्द्याहून आंदोलन शुक्रवारी संप पुकारला आहे. पहाटेपासून तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही. या आंदोलनात जवळपास १५३ अधिक पेक्षा कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर हे कर्मचारी ठाम आहेत. (latest marathi news)

Nashik Citylinc Employees Strike (file photo)
Nashik Market Committee : नाशिक बाजार समिती नोकर भरतीची उठविली स्थगिती; तक्रार योग्य नसल्याचे अहवालात नमूद

यात गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. गेल्या दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत आहेत. संपावर सायंकाळ सहापर्यंत काही तोडगा निघालेला नसल्याने प्रवाशांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.

वाहक उपोषणाच्या पवित्र्यात

सिटीलिंक बससेवा सुरू झाल्यापासून आजपर्यंत आंदोलन करण्याची आठवी वेळ वाहकांवर आली आहे. शुक्रवारी दिवसभरात ठेकेदार व कर्मचाऱ्यांसोबत एकदा चर्चा झाली, परंतु त्यात काही तोडगा निघाला नाही. मात्र, वाहकांना दमबाजी व शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. तसेच वाहकांनी या विरोधात गांधीगिरी करत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने आडगाव पोलीसांना संपर्क साधत पत्रव्यवहार केल्याचे समजते. यापुढे आणि काय होते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Nashik Citylinc Employees Strike (file photo)
Nashik Lok Sabha Election 2024 : आचारसंहिता लागणार, दक्ष राहून काळजी घ्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com