Nashik Citylinc Bus Strike : वेतन अदा करूनही कर्मचारी संप कायम; सिटीलिंक प्रशासन मेटाकुटीला

Citylinc Bus Strike : महापालिकेच्या वतीने भविष्य निर्वाह निधीची एक कोटी रक्कम तसेच थकीत ६५ लाख रुपये वेतन अदा केल्यानंतरही वाहक व चालकांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
A Citylink bus standing at the bus stop at Tapovan.
A Citylink bus standing at the bus stop at Tapovan.esakal

Nashik Citylinc Bus Strike : महापालिकेच्या वतीने भविष्य निर्वाह निधीची एक कोटी रक्कम तसेच थकीत ६५ लाख रुपये वेतन अदा केल्यानंतरही वाहक व चालकांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सिटीलिंक कंपनी प्रशासनाने ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या चुकीच्या निर्णयामुळे प्रवाशांना सलग आठव्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागणार आहे. (nashik citylinc Employees strike continues marathi news)

महापालिकेच्या सिटिलिंक कंपनीकडून शहरात बस चालविल्या जातात. सिटीलिंकने वाहक पुरविण्याचे काम मॅक्स डिटेक्टिव अँड सिक्युरिटीज या कंपनीला दिले आहे. गेल्या दोन वर्षांत मॅक्स कंपनीवर मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम आकारली आहे. ही रक्कम माफ करण्यासाठी कंपनीने वाहकांचे वेतन अडविले. वेतन थकविल्याने वाहकांनी दोन वर्षांत नऊ वेळा संप पुकारला.

गेल्या सात दिवसांपासून वाहकांचा संप सुरू आहे. शहरातील २५० पैकी तब्बल २१० बस बंद आहेत. यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदार घेत आहेत. सात दिवसांपासून संप सुरू असतानाही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही.

बुधवारी (ता.२०) वाहक पुरवठादार व वाहक संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक झाली. त्यात महापालिकेने पुढाकार घेत वेतनाचे ६५ लाख रुपये पुरवठादार कंपनीच्या बँक खात्यात जमा केले. तर ग्राहकांचे थकीत भविष्य निर्वाह निधीची एक कोटी रुपयांची रक्कमही अदा केली. मात्र वाहक चालकांच्या संघटनेने थकीत वेतन पूर्णपणे देण्याची मागणी कायम ठेवत संप चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला.  (latest marathi news)

A Citylink bus standing at the bus stop at Tapovan.
Nashik Citylinc Bus : सिटीलिंक वाहकांचा संप अखेर मागे; जानेवारीचे वेतन जमा

पंधरा हजार फेऱ्या रद्द

सिटीलिंक कंपनीच्या बस बंद असल्याने मागील सात दिवसांत सुमारे पंधरा हजार पाचशे फेऱ्या रद्द केल्या आहेत. यातून सिटीलिंक कंपनीला दररोज साडेआठ लाख याप्रमाणे ६० लाख रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. ऑपरेटर कंपन्यांना अप्रत्यक्ष फायदा करून देण्यासाठी तर संप नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.

अन्यथा ग्राहक न्यायालयात

सिटीलिंकच्या संपामुळे परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने संपावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी ग्राहक न्याय मंचात जाण्याचा इशारा नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला. या संपामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे.

त्यामुळे ग्राहक सेवेचा अवलंब करून सिटीलिंकने बससेवा त्वरित सुरू करावी. पासधारकांना संप काळातील दिवसांची मुदतवाढ द्यावी. अन्यथा प्रवासी ग्राहक, मासिक पासधारक व विद्यार्थी ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी ग्राहक न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा दिला आहे.

A Citylink bus standing at the bus stop at Tapovan.
Nashik Citylinc Employees Strike : दुसऱ्या दिवशीही सिटीलिंक वाहकांचा संप सुरूच; दिवसभर प्रवाशांचे हाल

मनसे आक्रमक

वाहकांकडून जितके दिवस संप चालेल तितक्या दिवसांची पास सवलत विद्यार्थ्यांना द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, सलीम शेख, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, मिलिंद कांबळे, किरण क्षीरसागर, संदीप भवर, विजय अहिरे यांनी निवेदन दिले.

''गेल्या सात दिवसांपासून वाहकांनी संप पुकारला आहे. या संपामुळे दिव्यांग बंधू भगिनींची फरफट होत आहे. तसेच दररोज बसने प्रवास करणारे वृद्ध, कामगार यांना त्रास सुरू आहे. तरीही सिटीलिंक बससेवा व संबंधित ठेकेदार यांनी संपावर तत्काळ तोडगा काढावा.''- दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख, प्रहार संघटना.

A Citylink bus standing at the bus stop at Tapovan.
Nashik Citylinc Bus Strike : सिटी लिंक मक्तेदाराला कंत्राट रद्दची अंतिम नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com