Weather Update
sakal
नाशिक: जिल्ह्याच्या पाऱ्यात बुधवारी (ता. १९) किंचित वाढ झाली असली, तरी वातावरणात गारठा कायम असल्याने सर्वसामान्यांना हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्ये ९.७ अंश सेल्सिअस तसेच निफाडला सुमारे ७ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला. पुढील तीन दिवस थंडीची लाट कायम राहील असा अंदाज आहे.