Nashik News : गोहरणचे खडी क्रशर तहसीलदारांकडून ‘सील’ : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nashik : सारूळ येथील उत्खननाचा प्रश्‍न जिल्हाभर गाजत असतानाच गोहरण (ता. चांडवड) येथे अवैध उत्खनन व बेकायदेशीर खडी क्रशर प्लांट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
Jalaj Sharma
Jalaj Sharmaesakal

Nashik News : सारूळ येथील उत्खननाचा प्रश्‍न जिल्हाभर गाजत असतानाच गोहरण (ता. चांडवड) येथे अवैध उत्खनन व बेकायदेशीर खडी क्रशर प्लांट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी थेट तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. यावरून जिल्हा गौण खनिज विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Nashik Collector jalaj sharma order on Gravel crusher of Goharan sealed by Tehsildar marathi news )

ग्रामपंचायतीच्या हद्दीत उत्खनन करण्यासाठी किंवा खडी क्रशर प्लांट सुरू करण्यापूर्वी विविध विभागांची परवानगी घ्यावी लागते. गोहरणच्या शिवारात खडी क्रशर प्लांटसाठी यापुढे परवानगी न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०१९ ला मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीने ठराव केलेला असताना येथील नितीन गुंजाळ, सचिन अग्रवाल व नितीन आहेर यांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक २१८/३ या गटात उत्खनन करण्यात आले.

याविषयी थेट जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसीलदारांनी येथील खडी क्रशरची पाहणी करीत ते ‘सील’ केले आहे. पण, संबंधित व्यक्तीने कोट्यवधी रुपयांचे मशिन्स येथे उभे करून यापूर्वीच उत्खनन केले.

खडी क्रशर प्लांट चालविला त्याचे काय, प्लांट सुरू करण्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळासह जिल्हा गौण खनिज विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक होते. पण, या विभागांना अंधारात ठेवून थेट उत्खनन सुरू केले. पाटचारीचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे शासकीय कंत्राट मिळाल्याने हे उत्खनन झाल्याचे आता सांगण्यात येते. पण, संबंधित विभागांकडून रीतसर परवानगी घेणे आवश्‍यक होते. (latest marathi news)

Jalaj Sharma
Nashik News : मालेगावला वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन! 25 हजारावर बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

बेकायदेशीर खडी क्रशर सुरू करून शासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम संबंधित व्यक्तीने केले आहे. त्यांना राजकीय किंवा शासकीय आश्रय असल्याशिवाय एवढा मोठा प्रकल्प रातोरात उभा राहूच शकत नाही, असे आरोप आता सुरू झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीने गौण खनिज विभागाकडे अर्ज सादर करून उत्खननाची परवानगी मागितली आहे.

मार्चअखेर सुमारे अडीच कोटी रुपये रॉयल्टी त्यांनी जमा केल्याचे समजते. गौण खनिज विभागाने एप्रिलमध्ये त्यांना उत्खननाची परवानगी दिल्याचे जिल्हा गौण खनिज विभागाने म्हटले आहे. मात्र, यापूर्वी झालेले उत्खनन व विनापरवनागी सुरू असलेल्या खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुन्हा परवानगीची घाई

गोहरणचे उत्खनन व खडी क्रशर प्लांट बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यावर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला. पण, आता संबंधित विभागाकडे रीतसर अर्ज करून परवानगी मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. गौण खनिज विभागाने तातडीने या प्रकरणाची फाईल मालेगावला पाठवली आहे. त्यामुळे खडी क्रशर पुन्हा सुरू करण्याची घाई केली जात असल्याचे दिसून येते.

Jalaj Sharma
Nashik News : नूतनीकरणानंतरही महात्मा फुले कलादालन बंदच! कलावंतांना फायदा ना महापालिकेला

म्हणून ग्रामपंचायतीने केला ठराव

गोहरणच्या शिवारातील गट क्रमांक १४१/२ मध्ये ओम इंडस्ट्रीज पार्टनर व गट क्रमांक १५८ मधील साईराम स्टोन क्रशर वगैरे कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव ३१ ऑगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे यापूर्वी २०१७ व २०१८ मध्ये दिलेल्या मंजुरीचे ठराव विखंडीत झाले आणि यापुढे कुठल्याही उत्खननास परवानगी न देण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर केला आहे.

''बेकायदेशीरपणे सुरू असलेला खडी क्रशर प्लांट संबंधित तहसीलदारांनी ‘सील’ केला आहे. यापूर्वी त्यांनी केलेले उत्खनन आणि त्यासंदर्भातील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय या प्लांटला परवानगी दिली जाणार नाही.''- रोहिणी चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी

Jalaj Sharma
Nashik News : सप्तश्रृंगगडासाठी ई-बसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद! आठवड्यात 2 लाख 32 हजाराचा व्यवसाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com