Nashik : पुराच्या पाण्यात गाडी चालवणं पडलं महागात; महाविद्यालयीन तरूणीचा मृत्यू

Nashik
NashikSakal

नाशिक : पुराच्या पाण्यात गाडी चालवणं नाशिकमधील एका मुलीच्या जिवावर बेतलं आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नाशिकमधील अकरावीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली आहे. काकासाहेब वाघ कनिष्ठ महाविद्यालयात सदर विद्यार्थिनी शिकत होती.

(Nashik College Student Death in Flood)

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. त्यामध्येच नाशिकमधील निफाड तालुक्यातील विंता नदीला मोठा पूर आला होता. यावेळी एक तरूणी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. विंता नदीला पूर आला असतानाही मुलीने पुराच्या पाण्यातून गाडी घालण्याचे धाडस केले पण पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली.

Nashik
मुलीचे चुंबन घेणाऱ्या डिलीव्हरी बॉयविरोधात हिंदू महासभा आक्रमक; केली 'ही 'मागणी

त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर काही नागरिकांनी तिला पाण्याच्या बाहेर काढलं पण तोपर्यंच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन केले असतानाही असं धाडस करणं कशा प्रकारे जिवावर बेतू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com