State Level Police Sports: नाशिक आयुक्तालयाच्या बॉस्केटबॉल संघाला 24 वर्षांनी सुवर्णपदक! आयुक्तांकडून खेळाडूंचा गौरव

Nashik News : या स्पर्धेतील विविध गटांमध्ये पदकप्राप्त केलेल्या खेळाडूंना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Prashant Bachhav along with the medal winners of the State Police Sports Competition
Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Prashant Bachhav along with the medal winners of the State Police Sports Competitionesakal

State Level Police Sports : येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये (State Level Police Sports Competition) नाशिकच्या पुरुषांच्या बॉस्केट बॉल संघाने २४ वर्षांनी नाशिक आयुक्तालयास सुवर्णपदक पटकावून दिले. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये पदकप्राप्त केलेल्या खेळाडूंना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. (Nashik State Level Police Sports competition marathi news)

नुकत्याच महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील १३ परिक्षेत्र व आयुक्तालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या ५६ पुरुष व २६ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

यात प्रामुख्याने नाशिक आयुक्तालयाच्या पुरुषांच्या बॉस्केटबॉल संघाने कोल्हापूर संघाला पराभूत करून २४ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. यात कर्णधार जावेद शेख, कय्युम सय्यद, प्रकाश शिंदे, गजानन पाटील, मयुर धूम, सूरज धुम, मनोज भोये, प्रणय रुद्रवंशी यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले होते.

याशिवाय, वेटलिफ्टिंगमध्ये पारस देशमुख याने सुवर्ण, मीनाक्षी तोंडे, सोनाली काटे, भाग्यश्री कापडणीस यांनी कांस्यपदक पटकावले. कुस्तीमध्‌ये राजश्री शिंदे हिने रौप्य तर, बॉडीबिल्डींगमध्ये संदीप निकम याने कांस्य, पावरलिप्टिंगमध्ये अश्विनी भोसले हिने सुवर्ण तर पारस देशमुख याने कांस्यपदक पटकावले आहे. (Latest Marathi News)

Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Prashant Bachhav along with the medal winners of the State Police Sports Competition
Nashik Police : शनिवारपासून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलिस’! पोलिस आयुक्तांची संकल्पना

ज्युदोतही सुनिता साबळे हिने कांस्य, बॉक्सिंगमध्ये मीनाक्षी तोंडे हिने सुवर्ण, तायक्वांदोत किशोरी देशपांडे हिने कांस्य, वुशुत कविता कर्पे हिने कांस्य पदक पटकावले होते. या स्पर्धेत नाशिक आयुक्तालयास ४ सुवर्ण, १ रौप्य व १० कांस्यपदक मिळाले आहेत.

या खेळाडूंना सहायक उपनिरीक्षक अश्पाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले होते. पदकप्राप्त या खेळाडूंचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२२) गौरव करण्यात आला. यावेळी उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Prashant Bachhav along with the medal winners of the State Police Sports Competition
Baramati News : बारामतीत कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधून सुप्रिया सुळेंचे सामान स्थलांतरीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com