Nashik News : दिंडोरीतील शासकीय कर्मचारी उशिरा येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

Nashik News : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे.
lack of attendance of Dindori employees on time
lack of attendance of Dindori employees on timeesakal

दिंडोरी : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. प्रत्यक्षात मात्र याचा दिंडोरी तालुका व ग्रामीण भागात कितपत फायदा झाला हे समजत नाही. कारण आजही कर्मचारी नियमांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. (Complaints of citizens that government employees in Dindori are coming late)

गुरुवारी (ता.४) सकाळी अकरा वाजता दिंडोरी शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली असता अनेकांना कामकाजाची सकाळची ९:४५ वेळ गाठणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. तर दुपारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. यामुळे दोन दिवस सुट्टया तरी चार-चार चकरा मारूनही काम होईना, असे म्हणण्याची वेळ सर्वसाधारण नागरिकांवर आली.

याकडे लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. दिंडोरी तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना फिरवाफिरवी होत असल्याचे चित्र आहे. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ‘साहेब, बाहेर व्हिजिटला गेले आहेत, मीटिंगला गेले आहेत, त्याचबरोबर जेवणाला गेले आहेत’, अशी उत्तरे दिली जात असल्याने सर्वसाधारण नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप होत आहे.

फेब्रुवारी २०२० पासून शनिवार, रविवार सुटी अन् सोमवार ते शुक्रवार कामकाज असे स्वरूप ठेवून कामाचे दिवस कमी करून कामाची वेळ वाढवली. ९:४५ या कामकाजाच्या वेळेत दिंडोरी शहरातील शासकीय कार्यालयात काही अधिकारी, कर्मचारी वेळेत दाखल झाले, तर काही कार्यालयात मात्र उशिरा येणारे कर्मचारी जास्त असल्याचे दिसून आले. तर सायंकाळी ५ वाजेपासूनच सी एन जी बसची वाट पाहत काही कर्मचारी स्टॉपवर हजर होते. (latest marathi news)

lack of attendance of Dindori employees on time
Nashik Bribe Crime : महावितरणाचा अभियंता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! पिंपळगाव बसवंत येथील घटना

"दिंडोरी पंचायत समितीत कामकाजाची वेळ झाली तेव्हा दरवाजे उघडे होते. मात्र, परिचर वगळता कार्यालयात कोणी दाखल झाले नव्हते. बाजूच्या बांधकाम कार्यालयात ९:४५ ला दोन कर्मचारी वगळता सर्व खुर्ची रिकाम्या होत्या. शासनाने लवकरात लवकर दाखले वितरित करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली अस्तित्वात आणल्यामुळे दाखले एक दिवसात मिळेल, असे सांगितले, मात्र चार-पाच दिवस चकरा मारूनही कामे होत नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात." - ज्येष्ठ नागरिक सीताराम जाधव.

"सर्व कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल. निवडणूक कामकाज असल्याने दाखले वितरित होण्यासाठी विलंब झाला. दोन दिवसांत सर्व दाखले वितरित केले जातील." - मुकेश कांबळे, तहसीलदार दिंडोरी

lack of attendance of Dindori employees on time
Nashik ZP School : जुलै उजाडूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com