Road Construction : दिंडोरी माळे दुमालात भर पावसात कॉक्रीट रस्ता

Nashik News : माळेदुमाला (ता. दिंडोरी) येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र संबंधित काम पावसाळ्यात सुरु असल्याने निकृष्ट रस्त्याची जबाबदारी निश्चित केली जावी.
Concreting of Kakadwasti road in progress
Concreting of Kakadwasti road in progressesakal

वणी : माळेदुमाला (ता. दिंडोरी) येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र संबंधित काम पावसाळ्यात सुरु असल्याने निकृष्ट रस्त्याची जबाबदारी निश्चित केली जावी. अशी मागणी आहे. माळे दुमाला येथे १५ व्या वित्त आयोग २०२२-२३ च्या निधीतून सुमारे चार लाख रुपये अंदाज पत्रक असलेल्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम काकड वस्ती ते माळेदुमाला या दरम्यान सुरु आहे. (Concrete road Construction in heavy rain in Dindori Male Dumal)

एकावेळी सिमेंट क्रॉक्रीट रस्त्याचे काम सुरु आणि त्याचवेळी मुसळधार पाऊसही असे अजब चित्र पाहायला मिळाले. भरपावसात मिक्सरने रस्त्यावर क्रॉक्रीटीकरणाचे काम सुरुच ठेवल्याने रस्त्यावर रस्त्यावर प्लॅस्टिक वापरण्याची तसदीही घेतली गेली नाही.

परिणामी पावसाच्या पाण्यासोबत सिमेंट आणि लिक्विड पूर्णपणे वाहून गेले. रात्री उशिराने मिक्सर गाड्या आल्यामुळे कामगारांनी व्हायब्रेट मशिन आणि फिनिशिंग न करता रस्ता बनवला. अशा या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. (latest marathi news)

Concreting of Kakadwasti road in progress
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

पन्नास वर्षांनंतर संबंधित रस्त्याचे काम होत असताना ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांनी साधे लक्षही दिलेले नाही. पावसात सिमेंट वाहून नित्कृष्ठ रस्ता झाल्यास हा निव्वळ पैशांचा चुराडा ठरणार असून ठेकेदारांच्या भरवशावर रस्ता बनविणे गावासाठी डोकेदुखीचे ठरु शकते अशा तक्रारी आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश कडाळे यांनी रस्त्याचे काम योग्य न झाल्यास जिल्हा परिषदेकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला.

Concreting of Kakadwasti road in progress
Nashik News : 'स्वाभिमानी शेतकरी'चा बारामतीतून एल्गार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com