Concretization up to the tree trunk
Concretization up to the tree trunkesakal

NMC News : महापालिकेविरोधात अवमान याचिका; मनपाकडून झाडांचे बुंध्यांचे काँक्रिटीकरण

NMC : झाडांचे बुंधा काँक्रिटीकरण करून आवळले जात असल्याने याविरोधात दिवाणी न्यायालयात महापालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

NMC News : शहरात रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक टाकताना तसेच रस्ते काँक्रिटीकरण करताना झाडांचे बुंधा मोकळे ठेवावे, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाच्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास झाडांचे बुंधा काँक्रिटीकरण करून आवळले जात असल्याने याविरोधात दिवाणी न्यायालयात महापालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. (nashik Concreting of tree trunks by municipality marathi news)

नोव्हेंबर २०१४ मध्ये पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी शहरातील वृक्षांचे बुंधा काँक्रिटीकारणातून आवळले जात असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. या संदर्भात त्यांनी पुरावेदेखील सादर केले होते. न्यायालयाने महापालिकेला या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या. महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षासंदर्भात योग्य ती जोपासना करण्यासाठी पावले उचलावी व वृक्षांच्या मुळास फरशा टाकू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते.

न्यायालयाचा आदेश होऊनही महापालिकेने वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याने न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात दाखल याचिकेत वृक्ष संदर्भात परिस्थिती कथन करण्यात आली आहे.

Concretization up to the tree trunk
NMC News : वस्त्रांतरगृह महापालिका येणार ताब्यात

आदेश देऊनही महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षांना पाणी मिळणार नाही, अशाप्रकारे पेवर ब्लॉक टाकले आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना थेट बुंध्यांवर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. डांबरीकरण करताना झाडांचे बुंधा आवळले गेले आहेत. यातून वृक्ष वाढीला मर्यादा येत असल्याची बाब अवमान याचिकेत मांडण्यात आली आहे.

''शहरात काँक्रिटीकरण व डांबरीकरण करताना झाडांची बुंदे मोकळी ठेवावीत, अशा स्पष्ट सूचना आहेत. मात्र असे असतानाही अजूनही काँक्रिटीकरण व डांबरीकरण तसेच पेव्हर ब्लॉक टाकून झाडांचे बुंधा आवळले जात आहे. यातून वृक्षवाढीला मर्यादा येतात व पर्यावरणाची हानी होत असल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.''- निशिकांत पगारे, याचिकाकर्ते. (latest marathi news)

Concretization up to the tree trunk
NMC News : आस्थापना खर्च पोचला 49 टक्क्यांवर; अट शिथिलतेला मर्यादा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com