
नाशिक : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाने महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांना आता आकाश ठेंगणे झाले आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नैराश्याचे वातावरण आहे. नववर्षात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, यासाठी ‘मविआ’च्या घटका पक्षांसमोर मोठे आव्हान असेल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी नेत्यांसमोर मोठे आव्हान असेल.