esakal | नाशिक जिल्ह्यात १७८ रुग्‍णांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नाशिक जिल्ह्यात १७८ रुग्‍णांची कोरोनावर मात

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या घटत नसल्‍याची स्‍थिती आहे. गुरुवारी (ता. ८) जिल्ह्यात नऊ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. दिवसभरात १६० रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. १७८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सध्या जिल्ह्यात एक हजार ७८७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.


गुरुवारी नोंदविलेल्‍या नऊ मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीण क्षेत्रात पाच, नाशिक शहरात तीन, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक ग्रामीणमधील ९४, नाशिक शहरातील ५४, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन, तर जिल्‍ह्याबाहेरील दहा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.
सायंकाळी उशिरापर्यंत ९०२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात सर्वाधिक ४५२ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्राचे असून, मालेगाव २३२, नाशिक शहरात २१८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५२४ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ४८७ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले आहेत.

(160 new corona patients reported in nashik diastrict)

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

loading image