esakal | 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', खडसेंच्या चौकशीवर फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Khadase Fadanvis

'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना बजावलेली नोटीस व त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना झालेल्या अटकेवरून माध्यमांच्या विचारलेल्या प्रश्‍नावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी ईडीचा प्रवक्ता नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गुरुवारी (ता.८) दिली. (devendra fadnavis angry reaction to eknath khadse's ed inquiry)


शहर बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नाशिक दौर्यावर आलेल्या फडवणीस यांना माध्यमांनी खडसे यांच्यावर ईडी प्रकरणी झालेल्या कारवाई बद्दल विचारले. खडसे प्रकरणात मी काय बोलणार, पुरावे असतील म्हणून ईडी करतं असेल, मी ईडीचा प्रवक्ता नाही.
ईडी त्यांचे काम करीत आहे. चौकशीतून काय ते समोर येईलच, भाजपमधुन बाहेर पडल्यामुळे ईडीचे शुक्लकाष्ट लावले जात असल्याचे चुकीचे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय मंत्रीमंडळात चौघांना स्थान मिळाले आहे. याचा महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच फायदा होईल, असा दावा करीत डॉ. भारती पवार यांना चांगले खाते मिळाले असून गेल्या पन्नास वर्षात केंद्रीय मंत्रीमंडळात नाशिकला प्रथमचं स्थान मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

हेही वाचा: नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - फडणवीस

मुंडेंना बदनाम करू नका

खासदार प्रीतम मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्याने त्या नाराज असल्याच्या प्रश्‍नावर फडणवीस म्हणाले, त्या अजिबात नाराज नाही. त्यांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, भाजपमध्ये सर्वोच्च नेते निर्णय घेतात. योग्यवेळी सर्वांना न्याय मिळतो. त्यामुळे कारण नसताना मुंडे यांची बदनामी नको. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने भाजप- शिवसेना युतीच्या चर्चेवर परिणाम होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्यासंदर्भात विचारले असता चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात. राणे यांना त्यांची क्षमता पाहून केंद्रीय मंत्रीपद दिले गेल्याचे फडणवीस म्हणाले.

दबावतंत्राचा भाग - भुजबळ

भोसरी जमिन प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या परिवाराला ईडीने समन्स बजावल्याने त्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबबळ यांना विचारले असता, हा दबावतंत्राचा एक भाग असल्याचा आरोप केला. भाजप सोडून बाहेर पडले तर, काय होते हे भाजपला दाखवायचं आहे, इतर पक्षातील नेत्यांना त्रास देवून आपल्या पक्षात आणायचे व त्यांचे सगळे गुन्हे माफ करण्याचे उद्योग भाजपने सुरु केले आहेत. राजकारणात असे प्रयोग होत असले तरी खडसे व आम्ही सगळे मिळून योग्येवेळी उत्तर देवू, असा ईशारा त्यांनी दिला.
(devendra fadnavis angry reaction to eknath khadse's ed inquiry)

हेही वाचा: मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, फडणवीस यांना निवेदन

loading image