esakal | नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १६५ पॉझिटिव्‍ह, १६६ कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १६५ पॉझिटिव्‍ह, १६६ कोरोनामुक्‍त

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात शहराइतकेच कोरोना बाधित ग्रामीण क्षेत्रात आढळत आहेत. शुक्रवारी (ता.९) जिल्‍ह्यात १६५ पॉझिटिव्‍ह आढळले. तर १६६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. सात बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ७७९ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (165 corona positive patients reported in nashik district)

शुक्रवारी जिल्‍ह्यात झालेल्‍या सात मृत्‍यूंमध्ये ग्रामीण भागातील पाच बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. तर नाशिक महापालिका हद्दीतील दोघा बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७३, नाशिक ग्रामीणमधील ७२, मालेगावचे आठ तर जिल्‍हा बाहेरील बारा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ३५४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी सर्वाधिक ८१८ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक शहरातील ३०१, मालेगावच्‍या २३६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५७२ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५४२ रुग्‍णांचा समावेश होता. गेल्‍या अनेक दिवसांनंतर जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दिवसभरात एकही रुग्‍ण दाखल झाला नाही. नाशिक ग्रामीण क्षेत्रात १९, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील ११ रुग्‍णांचा यात समावेश आहे.

(165 corona positive patients reported in nashik district)

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे

loading image