esakal | नाशिक : जिल्‍ह्यात आज शंभर रुग्‍णांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

nashik corona news

नाशिक : जिल्‍ह्यात आज शंभर रुग्‍णांची कोरोनावर मात

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात पुन्‍हा ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत (Corona active patients) होणारी घट जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक आहे. रविवारी (ता. ५) जिल्‍ह्यात ८९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. शंभर रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

पॉझिटिव्‍हीटी दर २.२८ टक्‍के

रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३८, नाशिक ग्रामीण क्षेत्रात ४४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्‍हाबाहेरील सात रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. मालेगावला नव्‍याने एकही कोरोनाबाधित दिवसभरात आढळला नसल्‍याचे दैनंदिन वैद्यकीय अहवालात नमूद आहे. जिल्‍हाभरात एक बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे. प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत मोठी घट झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत अवघे ८० अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक शहरातील ७१, तर मालेगावच्‍या नऊ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७५५ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ७४१ रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ११ रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश राहिला. दिवसभरात तीन हजार ९०० रुग्‍णांची स्‍वॅब चाचणी झाली. त्यापैकी ८९ अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याने, रविवारचा पॉझिटिव्‍हीटी दर २.२८ टक्‍के राहिला.

हेही वाचा: "शासन श्रद्धेच्या आड येणार नाही; पण निर्बंध पाळा"

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचे संकेत; महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना

loading image
go to top