नाशिकचे नगरसेवक शिंदेच्या संर्पकात; शिवसेनेत संशयाचा धुराळा

Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi Newsesakal

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी बुधवारी (ता. १३) मुंबईत बोलतांना मुंबई सोबतच नाशिकचे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने शिवसेनेच्या (Shiv sena) गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भविष्याचे माहिती नाही; पण सध्या तरी कुणी नसल्याचे स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Nashik corporator in contact with eknath Shinde nashik political Latest News)

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी असलेल्या खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकला मेळावा घेऊन नाशिकची शिवसेना जागेवरच असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

मात्र शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा विरत नाही तोच बुधवारी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत त्यांच्यासोबत नाशिकचे नगरसेवक असल्याचा दावा केल्याने पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडाळीच्या परिणामाकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात बहुमताने आमदार आहेतच सोबत काही खासदारही त्यांच्या मताशी सहमत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या गोटात शिंदे यांच्या दाव्याकडे लक्ष लागून आहे.

Eknath Shinde Latest Marathi News
Nashik : आपत्कालीन कक्षात 7 दिवसात 35 तक्रारी

...सध्या कुणी नाही!
श्री. शिंदे यांनी नाशिकचे नगरसेवक सोबत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याविषयी स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाशिकची शिवसेना जागेवरच आहे. नाशिकमधून कुणी जाणार नसल्याचा दावा केला. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सध्या तरी श्री. शिंदे यांच्यासोबत कुणीही नसल्याचे सांगितले.

Eknath Shinde Latest Marathi News
‘मुक्‍त’च्‍या BAच्‍या परीक्षेत मनुस्‍मृती, समर्थ रामदासांवरील प्रश्‍नावर आक्षेप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com