तनय, सत्‍यजितची चमकदार कामगिरी

तनय, सत्‍यजितची चमकदार कामगिरी
Published on: 
एन्कर -- फोटो : H34673, H34672 रणजी करंडकात नाशिकच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी तनय संघवीचा अष्टपैलू खेळ, तर सत्यजित बच्छावचे १३ बळी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित रणजी चषक स्‍पर्धेत नाशिकच्‍या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. क्रिकेटपटू तनय संघवीने महाराष्ट्र संघातर्फे अष्टपैलू कामगिरीने, तर सिक्कीमतर्फे सत्यजित बच्छावने आपआपल्‍या संघासाठी भरीव योगदान दिले. इडन गार्डन्स, कोलकाता येथे तनय संघवीने आपल्या तिसऱ्याच रणजी सामन्यात नाबाद ६० व सामन्यात ५ बळी अशा जोरदार अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले व महाराष्ट्र संघाच्या बंगालवरील निर्णायक विजयात मोठा वाटा उचलला. पहिल्या डावातील तनयने आठव्या क्रमांकावर खेळताना केलेल्या महत्त्वपूर्ण सर्वाधिक नाबाद ६० धावांच्या जोरावर महाराष्ट्राने मोहम्मद शमीच्या बंगाल संघावर ७५ धावांची आघाडी घेतली. शेवटच्या गड्यासाठी त्याने प्रदीप दाढेसोबत ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्याने महाराष्ट्राला २१८ इतकी मजल मारता आली. त्याआधी आपल्या जलदगती गोलंदाजीने तनयने ३ महत्त्वपूर्ण बळी टिपत बंगालला पहिल्या डावात १४३ धावांत रोखण्यात वाटा उचलला. ९ षटकांत ३० धावा देताना ३ गडी बाद केले. बंगालच्या दुसऱ्या डावात त्याने वरच्या फळीतील दोन फलंदाज बाद केले व बंगालला १८६ इतकीच मजल मारता आली. महाराष्ट्राच्या पृथ्वी शॉ, सचिन धस या सलामीविरांनी नाबाद अर्धशतके झळकावून विजयासाठी आवश्यक ११२ धावा सहज पूर्ण करत १० गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरीने तनय संघवी सामनावीर ठरला. अहमदाबाद येथे सिक्कीमकडून खेळताना सत्यजित बच्छावने मणिपूर विरुद्ध सामन्यात तब्बल १३ बळी घेण्याची अफलातून कामगिरी करून सिक्कीमला २०१ धावांनी विजय मिळवून दिला. सत्यजितने आपल्या भेदक डावखुऱ्या फिरकीने पहिल्या डावात मणिपूरचे ६ तर दुसऱ्या डावात ७ फलंदाज तंबूत पाठवले. व मणिपूरवर निर्णायक विजय मिळवण्यात मोठी कामगिरी केली. सत्यजितने पहिल्या डावात फलंदाजीतदेखील सिक्कीमच्या ४१ धावांचे योगदान दिले. या कामगिरीबद्दल तनय संघवी, सत्यजित बच्छावचे अभिनंदन नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.