Nashik Crime News : गोडावूनमधून 25 टन लोखंडी सळ्या चोरीला

Nashik News : पाथर्डी गावाच्या शिवारातील महालक्ष्मी स्टील कंपनीतील १७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५ टन सळ्या चोरून नेल्या ही घटना घडली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

नाशिक : सोहम सेल्स कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांनी पाथर्डी गावाच्या शिवारातील महालक्ष्मी स्टील कंपनीतील १७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५ टन सळ्या चोरून नेल्या ही घटना घडली आहे. कंपनी व्यवस्थापक पवन भुतडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्री महालक्ष्मी स्टील या कंपनीचे गोडाऊन पाथर्डी शिवारात आहे. (25 tonnes of iron bars stolen from Godown)

१९ मे २०२४ रोजी रात्री एकला कंपनीतील क्रेन ड्रायव्हर श्‍यामसुंदर यादव यास जाग आली असता तेव्हा दोन इसम गोडावूनमधून एका गाडीत लोखंडी सळ्या टाकत असल्याचे त्याने पाहिले.

घाबरून गेल्याने काही न सांगता तो परत झोपून सकाळी मॅनेजर भुतडा हे कामावर आले असता श्‍यामसुंदरने त्यांना सांगितले की, एमएच १५ एचएच ७६७६ या क्रमांकाच्या गाडीत कंपनीतील कर्मचारी शिवशंकर आणि सूरज व राम हे सळ्यांचे बंडल टाकत असताना पाहिले. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Crime News : भुसावळमधील खून प्रकरणी मुख्य संशयितास नाशिकमधून अटक!

त्याने हे सांगितल्यानंतर भुतडा यांनी गोडावूनमधील मालाचे ऑडिट केले. तेव्हा त्यांना २५ टन माल कमी असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता त्यांना सोहम सेल्स कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या सुरज व राम बोडके यांनी शिवशंकरच्या मदतीने हा माल चोरल्याचे समजले.

याप्रकरणी भुतडा यांच्या फिर्यादी वरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. सोनार करीत आहे.

Nashik Crime News
Navi Mumbai Crime: कमी किमतीत सोने खरेदीचे प्रलोभन, महिलेला २८ लाखांचा गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com